हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या अत्र तत्र सर्वत्र शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटावरून एव्हढा वाद निर्माण होईल याचा कुणी अंदाजच बांधला नव्हता. पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणे प्रदर्शित झाल्यापासून हिंदू संघटना, कमिटी, नेटकरी सगळेच आग पाखड करताना दिसत आहेत. जो तो या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमूळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचे आरोप करीत आहे. या दरम्यान पठाणनंतर शाहरुखचा डंकी चित्रपट पाईपलाईनमध्ये आहे आणि म्हणून आता या चित्रपटावर देखील लोक बहिष्कार टाकण्याबद्दल बोलत आहे. या सगळ्यातच चालू वाद इतका टोकाला गेला आहे कि शाहरुखविरोधात निदर्शने होत असून काही ठिकाणी त्याचा पुतळा जाळण्यात आला आहे.
बॉलीवूडच्या बादशहाचे ग्रह फिरले, कर्म चुकली का संकटांचं त्याच्यावर प्रेम जडलंय हे काही माहित नाही. पण आता शाहरुखचं काही खरं नाही हेच खरं. एकीकडे त्याचा पठाण अडचणीत. तर दुसरीकडे डंकी. लोकांनी तर शाहरुखच्या सगळ्याच चित्रपटांवर बहिष्कार टाकायचा नक्की केलं आहे. अनेकांनी त्याच्या विरोधात तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. पठाण’सोबत आता त्याचा आगामी चित्रपट डंकीसुद्धा या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. झालं असं कि, मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये सध्या वातावरण पेटलंय. शाहरुखच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
यापूर्वी या राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काहीही झालं तरी शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. दरम्यान शाहरुख विरोधात जबलपूरमध्ये निदर्शने झाली आणि मोठा राडा पहायला मिळाला. केवळ जबलपूर नव्हे तर मथुरेतही निदर्शनं झाली. इतकाच काय तर शाहरुखचा पुतळासुद्धा जाळण्यात आला. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, विष्णु परिषद आणि बजरंग दलाच्या काही सदस्यांनी डंकीच्या सेटबाहेर जाऊन मोठा दंगा देखील केला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, असेही सांगितले जात आहे.
Discussion about this post