हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वादग्रस्त ब्रिटिश लेखक सलमान रुश्दी यांच्यावर न्यूयॉर्क मध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
Salman Rushdie, the author whose writing led to death threats from Iran in the 1980s, was attacked and apparently stabbed in the neck Friday by a man who rushed the stage as he was about to give a lecture in western New York https://t.co/oHI2QUq1ni pic.twitter.com/PbZCLi7qiH
— TIME (@TIME) August 13, 2022
माहितीनुसार, ‘एका साहित्य विषयक कार्यक्रमात जेव्हा सलमान रुश्दी स्टेजवर होते तेव्हा हल्लेखोराने त्यांच्या मानेवर चाकूने हल्ला केला. यानंतर पेंसिलवेनियाच्या एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर सर्जरी झाली.
Author Salman Rushdie was transported to a hospital via helicopter after being attacked at an event in New York.
Rushdie, who has faced death threats over his writing, suffered an apparent stab wound to the neck. https://t.co/VV2wG3YRXv pic.twitter.com/R6B567L4GN
— ABC News (@ABC) August 12, 2022
सलमान रुश्दींवर झालेल्या या हल्ल्यामूळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली. दरम्यान आता बॉलीवूड क्षेत्रातून अनेक सेलिब्रिटींनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने या घटनेचा निषेध केला आहे. तिने अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्टोरी शेअर करत लिहिलंय कि, ‘या जिहादींनी (कट्टरपंथियांनी) आणखी एक भयानक कृत्य घडवून आणलं. ‘द सटॅनिक वर्सेज’ आपल्या काळातील दर्जेदार पुस्तकांपैकी एक आहे, माझ्याकडे शब्द नाहीत. मी स्तब्ध झाले आहे.’ याशिवाय बॉलीवूड क्षेत्रातून अभिनेत्री स्वर भास्कर आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनीही ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Thoughts and prayers for #SalmanRushdie
Shameful, condemnable and dastardly this attack! #SalmanRushdieStabbed— Swara Bhasker (@ReallySwara) August 12, 2022
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने लेखक सलमान रुश्दी यांच्यावर झालेल्या भीषण हल्ल्याचा कडक शब्दात निषेध जाहीर केला आहे. याबाबत तिने ट्वीट करत लिहिलं आहे कि, ‘सलमान रुश्दी यांच्यासाठी मी प्रार्थना करते. हे खूपच लाजिरवाणं आणि भ्याडपणाचं कृत्य आहे.’ याशिवाय बॉलिवूडमधील ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी देखील ट्वीट करून संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे कि, ‘काही कट्टरपंथीयांनी सलमान रुश्दी यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. मला खात्री आहे की न्यूयॉर्क पोलिस हल्लेखोरांच्या विरोधात कडक कारवाई करतील’
I condemn the barbaric attack on Salman Rushdie by some fanatic . I hope that NY police and the court will take the strongest action possible against the attacker .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) August 12, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वंशाचे वादग्रस्त ब्रिटिश लेखक सलमान रुश्दी यांच्यावर हल्ला होण्याआधी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. त्यांचे वादग्रस्त पुस्तक ‘द सनॅटिक वर्सेज’ या पुस्तकामुळे ८० च्या दशकात हि धमकी त्यांना देण्यात आली होती. दरम्यान हि धमकी त्यांना ईराणमधून देण्यात आली होती असे सांगण्यात आले होते. हे पुस्तक १९८८ सालामध्ये ईराणमध्ये बॅन करण्यात आलं. ईराणचे दिवंगत नेता अयातुल्ला रुहोल्लाह खुमैनी यांच्याकडून सलमान रुश्दी यांना जीवे मारण्याचा धार्मिक आदेश त्यावेळी जारी करण्यात आला होता.
Discussion about this post