हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड आणि साऊथचा लाडका अभिनेता आर. माधवन याचा ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला चाहत्यांचे खूप प्रेम मिळत आहे. हा चित्रपट २ जुलै २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांसह समीक्षकांनीही त्याला चांगली पसंती दिली होती. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पाहावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा म्हणाले होते. यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे.
‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट तब्बल ३ आठवड्यांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. दिनांक २६ जुलै २०२२ रोजी हा चित्रपट Amazon Prime या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अॅमेझॉन प्राइमने स्वतः याविषयीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. यामुळे प्रेक्षकांनाही एक चांगलं सरप्राईज मिळालं आहे. मात्र, हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होणार की नाही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये फक्त तामिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषेचा उल्लेख करण्यात आल्यामुळे हिंदी भाषेत हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याबाबत उत्सुकता कायम आहे.
‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक काहीसे पुढीलप्रमाणे आहे:- नंबी नारायणन यांना हेरगिरीच्या खोट्या केसमध्ये कसे अडकवले जाते. शिवाय त्यांना अटक केली जाते आणि मग पुढे काय काय आणि कसं कसं घडतं..? हे सर्व या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातून अभिनेता आर. माधवन याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. शिवाय यात त्याने नंबी नारायणन यांची भूमिका साकारली आहे. तर शाहरुख खानने या चित्रपटात कॅमिओ करीत एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे.
Discussion about this post