हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बाहुबली’ फेम दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि तरुणांच्या दिलाची धाडकन पूजा हेगडे यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘राधे श्याम’ हा चित्रपट गेल्या वर्षभरापासून चांगलाच चर्चेत राहिला आहे. हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित झाला असता पण कोरोनामुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. तब्बल ३५० कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचे पहायला मिळाले. मात्र ज्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी तो ओटीटीवर प्रदर्शित होतोय. होय. येत्या एक एप्रिलपासून हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर पाहता येईल. त्यामुळे प्रभासच्या चाहत्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे असे म्हणायला हरकत नाही.
राधे श्याम या चित्रपटाचे कथानक एक प्रेमकहाणी आहे. ही प्रेमकहाणी अशा दोघांची आहे, ज्यांना त्यांच्या हातावरील रेषा कधीच एकमेकांना भेटून देणार नाहीत. ज्यांचं नशीब नेहमीच त्यांना एकमेकांपासून वेगळं करण्याच्या प्रयत्नांत असते. यातील विक्रम आदित्य हि भूमिका प्रभास निभावतोय. तर प्रेरणा हि भूमिका पूजा हेगडे निभावतेय. हि प्रेमकहाणी या विक्रम आणि प्रेरणाची आहे. विक्रम हा हाताच्या रेषा पाहून भविष्य सांगतो आणि त्याने सांगितलेलं भविष्य कधीच चुकत नाही, असं या चित्रपटात दाखवलं आहे. पुढे काय होणार हे त्याला आधीच माहीत असतं. या शक्तीमुळे विक्रमला त्याच्या आयुष्यात प्रेम कधीच येऊ शकत नाही हे ठाऊक असत. तर प्रेरणा ही डॉक्टर आहे आणि तिचा भविष्यवाणीवर विश्वास नाही.
तो हाताच्या रेषांनाच जीवन मानतो तर ती कर्मावर विश्वास ठेवते. अशा या दोघांची हि प्रेमकहाणी फुलते कि ते कधीच एकत्र येत नाहीत..? हे जाणून घ्यायचे असेल तर हा चित्रपट जरूर पहा. या चित्रपटात मधेच इतरही अनेक घटना आहेत ज्या तुमचं लक्ष वेधून घेतील. दोघंही प्रेमात पडतात, पण एकाला ते प्रेम कळत नाही, तर दुसरा ते प्रेम मिळवण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडायला तयार होतो. आता हातावरच्या रेषांनी सांगितलेलं भविष्य खरं ठरेल का हि बाब शेवटपर्यंत उत्सुकता ताणते. तर येत्या १ एप्रिलपासून अॅमेझॉन प्राइम ओटीटी प्लॅटफॉर्मवर राधेश्याम हा चित्रपट पहा.
Discussion about this post