हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राहुल आणि दिशा यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ जोरदार वायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अगदी नववधू प्रमाणे नटलेली दिशा आणि नवरदेव बनलेला राहुल अगदी स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे राहुल आणि दिशाचे लग्न झाले, असे समजून चाहत्यांनी हे फोटो प्रचंड वायरल केले. इतकेच नव्हे तर त्यांना लग्नाच्या शुभेछया सुद्धा दिल्या. अजूनतरी राहून किंवा दिशा दोघांनी या फोटोबद्दल काहीच सांगितले नव्हते. मात्र आता याचा खुलासा झाला आहे. हे फोटो खऱ्या आयुष्यातले नसून त्यांच्या आगामी व्हिडीओ गाण्याच्या शूटिंग दरम्यानचे आहेत.
नुकतेच राहुल वैद्य आणि दिशा परमारने स्वत: देखील हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. नवी सुरुवात असे कॅप्शन देत राहुलने फोटो शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांनी राहुल आणि दिशाच्या या फोटोवर लग्न झाल्याचे समजून शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार हे फोटो रिअल लाईफमधले नसून रिल लाईफमधले आहेत. म्हणजेच राहुल आणि दिशा अजूनतरी विवाहबद्ध झालेले नाहीत. तर हे फोटो त्यांच्या आगामी म्युझिक व्हिडिओतील आहेत.
राहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगसाठी दिशासोबत चंडीगढमध्ये आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्याने मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, जेव्हा तो लग्न करेल तेव्हा ते जगाला सांगून करेल. रिपोर्ट्सनुसार राहुल आणि दिशाचा एक नवीन म्युझिक व्हिडिओ येत आहे. यात लग्नाचा सीन दाखवण्यात येणार आहे. यासाठी दोघांनी असा पेहराव केला आहे. त्याच शूटिंग दरम्यानचे हे फोटो आणि व्हिडीओ क्लिप प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत राहुल आणि दिशा सोबत अली गोनी आणि जास्मिन भसीन देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Discussion about this post