Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ओह.. तुझं बजेट नसेल ना’; खालच्या पातळीचे ट्रोलिंग करणाऱ्याला राहुल वैद्यचे सडेतोड प्रत्युत्तर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 2, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Rahul Vaidya
0
SHARES
1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील छोट्या मोठ्या पडद्यावर आपलं नशीब आजमावत मेहनतीने विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकणारे सगळेच कलाकार सलमान, शाहरुख किंवा अमिताभ बच्चन होऊ शकत नाहीत. पण हे कलाकार त्यांच्या त्यांच्या मेहनतीने छोटीशी का होईना स्वतःची ओळख बनवून प्रसिद्ध झालेले असतात. अशीच प्रसिद्धी देणारा एक शो म्हणजे ‘इंडियन आयडॉल’. आजकाल हा शो विविध कारणांमुळे सतत ट्रोल होत असला तरीही या शोने अनेक हिरे मनोरंजन विश्वाला दिले आहेत. यापैकी एक म्हणजे राहुल वैद्य. नुकतेच सोशल मीडियावरील त्याचे एक ट्विट व्हायरल झाले आहे. हे ट्विट नसून एका ट्रोलरसाठी प्रत्युत्तर आहे.

Useless, worthless, shameless exactly Bhagoda is good for nothing. Wedding singer is flop.

— Md.Johan Khan (@MdJohanKhan4) October 30, 2022

इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वात राहुल वैद्यने आपल्या गोड गळ्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. यानंतर त्याने सिनेसृष्टीसाठी अनेक गाणी गायली आहेत. शिवाय बिग बॉस सिजन 14’मध्ये त्याने आपल्या हटके स्टाईलने जान आणली होती. असे असले तरीही ट्रोलिंग त्याला काही चुकलेलं नाही. एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर राहुलसाठी अत्यंत अपमानजनक भाषा वापरत त्याला ‘तू फक्त लग्नात गाणारा Flop गायक आहेस’ असे म्हटले. या टीकेमुळे राहुल थोडा हडबडला असेलच. पण अद्वातद्वा बोलण्यापेक्षा त्याने कमी शब्दात मारक प्रत्युउत्तर देणे जास्त योग्य समजले आहे.

Aapki shaadi hui hai ?? I can come there also .. oh wait! Aapka budget nahi hoga … so probably next life. https://t.co/YH5xpjqIUq

— RAHUL VAIDYA RKV (@rahulvaidya23) October 30, 2022

या नेटकऱ्यानं केलेली प्रतिक्रिया राहुलच्या चांगलीच जिव्हारी लागली आणि त्याने या नेटकऱ्याला जशास तसे उत्तर दिले आहे. नेटकऱ्याचे ट्विट रिट्विट करत राहुलने यावर लिहिले आहे कि, ‘तुमचं लग्न झालं आहे का..? काळजी करु नका.. मी तुमच्याही लग्नात येईन. ओह.. पण मला तुमच्या लग्नात गायला बोलवावं इतकं तुमचं बजेट नसेल ना.. त्यामुळे कदाचित पुढच्या जन्मात.’ राहुलचं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. मुख्य म्हणजे राहुलच्या या भूमिकेला त्याच्या चाहत्यांनी आणि अन्य नेटकऱ्यांनी आपले समर्थन दिले आहे.

Tags: Bollywood SingerRahul VaidyaSocial Media Trollingviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group