हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवर अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका म्हणजे ‘भाग्य दिले तू मला’. या मालिकेतील राजवर्धन आणि कावेरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना मालिकेशी जोडून ठेवत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या मालिकेतील ट्विस्ट मालिकेतील रुची आणखीच वाढवू लागले आहेत. मालिकेचं कथानक आणि मालिकेचे कलाकार दोघांनी मिळून मालिकेचा टीआरपी वाढवला आहे. अशातच आता प्रेक्षकांचे लाडके राज आणि कावेरी एकरूप होणार आहेत. नुकताच यांचा साखरपुडा पार पडला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदी आनंद आहे.
आतापर्यंत राजने आपल्या प्रेमासाठी जे जे शक्य होतं ते सगळं केलं आणि त्याच्यासमोर येणारं प्रत्येक आव्हान त्याने परतवून लावलं. कावेरीच्या तात्यांनी राजची पूर्ण परीक्षा घेतली, पण राज त्यांच्या कसोटीवर खरा उतरला आणि त्याला त्याची कावेरी मिळालीच. तात्यांनी राजला चॅलेंज दिले होते की या गावात राहून दाखव कमवून दाखव… आणि तेही आईच्या नावाशिवाय. राजने हे चॅलेंज स्वीकारले आणि पूर्णदेखील केले. मालिकेमध्ये राजने कावेरीच्या प्रेमासाठी विटांच्या भट्टीवर काम केले, शेतकाम केले, अगदी टेम्पो ड्रायव्हर म्हणून सुद्धा काम केलं. शिवाय तात्यांच्या टपरीवर धुणे भांडीचेदेखील काम केले पण प्रत्येक आव्हान पेलले. अखेर हि परीक्षा संपली आणि राज पास झाला.
नुकताच या मालिकेत राज आणि कावेरीचा साखरपुडा पार पडला आहे. त्यांच्या नात्यातील गोडी आणखीच वाढली आहे. कावेरी आणि राजवर्धनच्या साखरपुडा सोहळ्याचे फोटो आणि काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये राज आणि कावेरी अगदी सध्या पण पारंपरिक अंदाजात दिसून आले आहेत. कावेरीने साखरपुड्यासाठी सुंदर अशी काठपदराची हिरवी साडी नेसली आहे. तर दुसरीकडे राजने कुर्ता- पायजमा परिधान केला आहे. या दोघांच्या साखरपुड्यानंतर आता मालिकेत काही सुखाचे क्षण आले आहेत.त्यामुळे प्रेक्षकही या क्षणांचा पुरेपूर आनंद घेत आहेत.
Discussion about this post