हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीच्या अटकेनंतर आता राहत्या घरी तिची पोलीस चौकशी करण्यात आली आहे. शिल्पा आणि राजच्या जुहूस्थित घरात क्राईम ब्रांचने शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकला आणि या दरम्यान राजचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. अटकेत असलेला उद्योजक आणि शिल्पाचा पती राज कुंद्रा याच्या पॉर्नोग्राफ़िक प्रकरणात तिचाही सहभाग आहे का? याबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शिल्पाची चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिला साधारण १० महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. राज कुंद्राला घेऊन क्राईम ब्रांचची टीम शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या घरी गेली होती. दरम्यान शिल्पाचा जबाब आणि धाडसत्र संपल्यानंतर तब्बल ६ तासांनी पोलिसांचे पथक राज कुंद्रासह घराबाहेर पडले. चला तर जाणून घेऊयात विचारलेले प्रश्न कोणते होते.
० शिल्पा शेट्टीला चौकशी दरम्यान कोणते महत्त्वाचे १० प्रश्न विचारले?
१) तुमच्याकडे चांगले शेअर्स होते. तेव्हा २०२० मध्ये तुम्ही विआन कंपनी का सोडली?
२) विआन आणि कॅमरिन कंपनी यांच्यातील पैशांच्या व्यवहाराबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
३) लंडनमध्ये अश्लील व्हिडीओ पाठवण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी विआनच्या ऑफिसचा वापर बर्याच वेळा केला गेला आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
४) हॉटशॉट ( HOTSHOT) कोण चालवते? आपणास माहित आहे का?
५) हॉटशॉटच्या व्हिडीओ सामग्रीबद्दल आपल्याला काय माहिती आहे?
६) तुम्ही कधी हॉटशॉटच्या कामात सहभाग घेतला आहे का?
७) हॉटशॉटबद्दल प्रदीप बक्षी (राज कुंद्राचा मेहुणा) यांच्याशी कधी संवाद झाला आहे का?
८) अटक केलेल्या आरोपीच्या मोबाईलवरील काही चॅट्स आणि मेसेजबद्दल प्रश्न
९) आपल्याकडे राज कुंद्राच्या सर्व कामांची माहिती आहे का? (तो काय काम करतो, त्याचा व्यवसाय क़ाय आहे )
१०) राज कुंद्राच्या आर्थिक व्यवहाराबद्दल काय माहिती आहे?
https://www.instagram.com/p/CM_FtHtBn5n/?utm_source=ig_web_copy_link
मुख्य बाब अशी कि, या कारवाई दरम्यान गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला असता त्यांना त्याच्या घरात सर्व्हर आणि ९० व्हिडीओ सापडले आहेत. जे ‘हॉटशॉट’साठी बनवले गेले असल्याची माहिती मिळत आहे. राजला याबाबत विचारले असता, ते इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच बोल्ड कंटेंट तयार करतात. परंतु हे सर्व ‘प्रौढ’ व्हिडीओंसाठी केले गेले नाहीत, असा त्याने दावा केला आहे.
Discussion about this post