Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राजमौलींचा ‘RRR’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार; कधी..? ते जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 18, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
RRR
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एस. एस. राजामौली यांचा ‘रौद्रम रणम रुधिरम’ म्हणजेच सुपरहिट ‘RRR’ २५ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. तब्बल ११०० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन असलेला आणि ज्युनियर एन.टी.आर व रामचरण यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आता OTTवर प्रदर्शित होतोय. हिंदी, तेलुगु, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पॅन इंडिया धर्तीवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर आता हा चित्रपट आपण ओटीटी नेटफ्लिक्सवर पाहू शकतो. नेटफ्लिक्सने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात लिहिलंय कि,”तुम्हाला आवाज ऐकू येत आहे का..? आम्ही उत्साहात ओरडत आहोत. ‘RRR’ हिंदी नेटफ्लिक्सर प्रदर्शित होत आहे, सज्ज रहा”.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

‘RRR’ हा चित्रपट अन्य भाषांमध्ये २० मे २०२२ रोजी ‘zee 5’ वर प्रदर्शित होणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी ‘zee 5’ ने माहिती दिली होती. तेव्हा ‘RRR’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर २० मे २०२२ रोजी होईल असे सांगितले होते. शिवाय इंग्रजीसोबतच हा सिनेमा तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम भाषेत आपण पाहू शकता, असंही सांगण्यात आलं होतं. त्यामुळे हिंदी भाषिक प्रेक्षक मनोरंजनाला मुकणार असेच वाटू लागले असताना आता नेटफ्लिक्सनं मात्र आनंदाची बातमी दिली आहे. आता RRR हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आणि ते हि नेटफ्लिक्सवर. यामुळे प्रेक्षक अत्यंत आनंदी आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

या चित्रपटाचे कथानक इतिहासातील ते पान उघडते जे कुणाला फारसे ठाऊक नाही. यातील अल्लुरी सीताराम राजू यांचा जन्म १८५७ रोजी विशाखापट्टणम येथे झाला. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी संसारिक जीवनातून संन्यास घेतला आणि मुंबई, वडोदरा, बनारस, ऋषिकेश अशा अनेक शहरांत प्रवास केला. अल्लुरी सीताराम राजू यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी १९२०दरम्यान आदिवासींना दारू सोडण्याचा आणि पंचायतीमध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला.

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

तोपर्यंत देश इंग्रजांच्या अत्याचाराखाली दबला होता. अल्लुरी यांच्या जीवनावर त्याचा खोल परिणाम झाला आणि त्यांनी अहिंसेचे विचार सोडून इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू केले. धनुष्य- बाण घेऊन इंग्रजांचा नायनाट करण्यासाठी ते निघाले. दरम्यान त्यांनी इंग्रजांकडून अनेक छळ सोसले. हि आव्हानात्मक भूमिका राम चरणने अव्वल निभावली आहे.

तर कोमाराम भीम यांचा जन्म १९०१ मध्ये संकेपल्ली, हैदराबाद येथे झाला. ते गोंड समाजाचे होते. कोमाराम यांच्या जीवनाचे उद्देश म्हणजे गुलामगिरीच्या साखळीत अडकलेल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देणे. फक्त १९ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना निजाम सैनिकांनी मारले. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भीमाने ‘निजामाला धडा शिकवायचे ठरवले. पण एकटे लढण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. त्यांच्यावर तेलंगणाचे वीर क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू यांचा प्रभाव होता. त्याच्याप्रमाणेच त्याला देशासाठी काहीतरी करायचे होते. हि आव्हानात्मक भूमिका ज्युनिअर एनटीआरने अव्वल निभावली आहे. या दोन अत्यंत महत्वपूर्ण क्रांतिकारकांचा इतिहास अनेकांना आजही माहित नाही आणि म्हणून हा चित्रपट प्रत्येकाने पहावा याकरिता निर्मात्यांनी थिएटरनंतर आता ओटिटीचा मार्ग अवलंबला आहे.

Tags: Jr.NTRNetflixOTT ReleaseRam CharanRRRS.S. RajamauliZee 5
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group