हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध कॉमेडियन आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांना कसरत करतेवेळी माईल्ड हार्ट अटॅक आला होता. यानंतर त्यांना दिल्ली एम्स रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आले होते. गुरुवारी मिळालेल्या हेल्थ अपडेटनुसार त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. यानंतर आज गेल्या ४२ तासांपासून ते शुद्धीत नसल्याचे समजत आहे. यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी अत्यंत काळजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान त्यांच्या पत्नीकडून देशाचे पंतप्रधान यांनी राजू यांच्या तब्येतीची माहिती घेतली आणि मदतीचे आश्वासन दिले आहे.
सुप्रसिद्ध हास्य कलाकार श्री राजू श्रीवास्तव जी की धर्मपत्नी से वार्तालाप कर राजू जी के स्वास्थ्य के विषय में जानकारी प्राप्त की।
प्रभु श्री राम से उनके शीघ्र स्वास्थ्य लाभ की कामना है।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) August 11, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला फोनद्वारे संपर्क साधला होता. यावेळी मोदींनी फोनवर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. इतकेच नव्हे तर राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला आवश्यक त्या मदतीचं आश्वासनही दिलं. माहितीनुसार, मोदींपुर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घेत कुटुंबीयांची विचारपूस केली होती. इतकेच नव्हे तर, राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनीही कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलंय. याशिवाय योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करीत लिहिलं होतं कि, ‘सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवजी यांच्या पत्नीशी बोलल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळाली. प्रभू श्री राम यांच्याकडे ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी कामना करत आहे.’
#UPDATE | Comedian Raju Srivastava is on ventilator at AIIMS Delhi, he is responding to clinical treatment: Sources
He was admitted here yesterday after he experienced chest pain and collapsed while working out at the gym. He underwent angioplasty later.
(File photo) pic.twitter.com/52YIqQVom0
— ANI (@ANI) August 11, 2022
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना बुधवारी जिममध्ये वर्कआऊट करताना ट्रेडमिलवर चालत असताना भोवळ आली. यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले गेले आणि त्यांना सौम्य हृदय विकाराचा झटका आल्याचे समजले. यानंतर डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी केली. यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. माहितीनुसार, ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यांना गेल्या ४२ तासांपासून शुद्ध आलेली नाही. राजू श्रीवास्तव यांचे भाऊ आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले कि, ‘राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये जात असताना हृदयविकाराचा झटका आला. ते राज्यातील काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत थांबले होते. ते सकाळी जिममध्ये गेले आणि त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.”
Discussion about this post