हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची ड्रामाक्वीन अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत राहिली आहहे. लग्न झालं आणि डाग मिळाला असं राखीसोबत दुसऱ्यांदा घडलं. पण यावेळी राखीने तिच्या पतीला चांगला इंगा दाखवला. सध्या तिचा पती आदिल खान दुर्रानी हा तुरुंगात आहे. राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारीला अटक केली होती. यानंतर न्यायालयाने आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज पुन्हा त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं आणि आता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. यावर राखीने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे येत्या २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत आदिल खान आता पोलीस कोठडीत असणार आहे आणि पोलिसांचा पाहुणचार घेणार आहे. आदिलला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर राखीने मीडियाला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि, ‘हा न्याय राखीला नाही, तर हिंदुस्तानी पीडित महिलेला मिळाला आहे. आधी पोलीस कोठडी सुनावली जाते. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत आरोपीची रवानगी होते. पण इतिहासात पहिल्यांदाच उलट घडलं आहे. आधी लग्न होतं मग सुहागरात होते. पण इथे लग्नाआधीच सुहागरात झाली’.
पुढे म्हणाली कि, ‘आदिलला पहिला न्यायलयीन कोठडी सुनावली गेली होती. त्यानंतर आता त्याला पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. पोलीस कोठडी मिळणं फार गरजेचं होतं. कारण त्याच्याशिवाय माझं किती नुकसान झालं हे कळालं नसतं. माझे पैसे, ज्वेलरी घेतल्याचं समोर आलं नसतं. ज्या कलमांअंतर्गत आदिलवर गुन्हा दाखल झाला आहे. ते आरोप सिद्ध करण्यासाठी पोलीस कोठडी मिळणं आवश्यक होतं’.
Discussion about this post