Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘.. हे मराठी बिग बॉस आहे’; आदिलच्या भेटीने पुसून टाकली राखी सावंतच्या मनातली खंत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 23, 2022
in Trending, Hot News, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
7.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा चौथा सिजन आता अंतिम टप्प्यावर आहे. यंदाचा हा सीजन कसाबसा तरला आणि यासाठी राखी सावंतची मोठी मदत झाली. बिग बॉस हिंदी गाजवल्यानंतर बिग बॉस मराठीच्या घरात राखीने चॅलेंजर म्हणून एंट्री केली आणि अंतर वाईल्ड कार्ड होऊन घरातल्या सगळ्यांची झोप उडवली. राखीने या घरात नुसता हैदोस घातला. अनेकदा धमाल मस्तीही केली. राखी म्हणजे एंटरटेनमेंटचा फुल्ल डोस असं उगाच थोडीच म्हणतात. पण बिग बॉसच्या फॅमिली वीकमध्ये राखी थोडी नाराज दिसली. आपल्याला कुणीच भेटायला येणार नाही असे वारंवार म्हणताना दिसली. शेवटी नाराज राखीच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड आदिल तिच्या भेटीसाठी बीबी हाऊसमध्ये एंटर झाला.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नेहमीच जोरजोरात भांडणारी.. दंगा करणारी.. सगळ्यांच्या नाकी नऊ आणून नुसता राडा करणारी राखी सावंत नुकतीच बिग बॉसच्या घरात भावुक होताना दिसली. ‘मी बिग बॉसचे इतके सीजन केले पण आजपर्यंत मला भेटायला कुणीच आलं नाही.. मला माहित आहे आताही कुणी येणार नाही’ असे वारंवार राखी म्हणताना दिसली. आपल्या भेटीसाठी कुणीच येणार नाही याची सल कुठेतरी राखीला मनातून पोखरत होती. पण शेवटी राखीला असं पाहून बिग बॉसने तिला मोठं सरप्राईज देऊन टाकलं. ज्यामुळे आता राखी खूप खूप खूप आनंदी होणार आहे. कारण आज तीचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रांनी तिला भेटायला बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीने ८० दिवसांचा टप्पा पार केल्यानंतर घरात फॅमिली वीक सुरु आहे. आपल्या कुटुंबियांना पाहून नेहमी भांडणारे यावेळी रडताना दिसले. सगळ्यांचे नातेवाईक पाहून राखीचं भावुक होणं साहजिक होत. एव्हढे सीजन करून आपल्या भेटीसाठी कुणीच येत नाही हि तिची खंत आता दूर होणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात तीच हे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रोमोवर, बिग बॉस म्हणतात ‘राखी तुमच्या घरून कुणीही तुम्हाला भेटायला आलं नाही.’ यावर राखी म्हणते मला माहीत होतं, असंच होणार आहे.’ इतक्यात अचानक दरवाजा उघडतो आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल घरात एंटर करतो. तिच्यापुढे येऊन उभा राहतो आणि चक्क गुडघ्यावर बसून तिला मराठीत प्रपोज करतो. म्हणतो ..,’मी तुझ्यावर खूप प्रेम करतो’ हे पाहून राखी भारावून जाते आणि म्हणते असं आजवर कधीही झालं नव्हतं. त्यावर अपूर्वा म्हणते, ‘हे बिग बॉस मराठीचं घर आहे’.

Tags: Adil Khan DurraniBigg Boss Marathi 4colors marathiPromo Videorakhi sawant
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group