Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या मॅटरपासून लांब रहा नाहीतर..’; सलमान खानला सपोर्ट केल्याप्रकरणी बिष्णोई गॅंगची राखी सावंतला फायनल वॉर्निंग

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 20, 2023
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
3.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाईजान अर्थात प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला लॉरेंस बिष्णोई गॅंगने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्याची सिक्युरिटी वाढवण्यात आली आहे. पण आता या प्रकरणात सलमान खानला भाऊ मानणाऱ्या राखी सावंतलाही धमकीचा मेल आल्याचे उघड झाले आहे. सलमान खानला सपोर्ट केल्याप्रकरणी आपल्याला बिष्णोई गॅंगने धमकी दिल्याचे स्वतः राखी सावंतने माध्यमांना सांगितले आहे. या मेलमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने राखीला सलमान खान संबंधित प्रकरणापासून दूर राह अन्यथा तू हि तयार राह असा मेल पाठवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Gulf Good News (@gulfgoodnews)

यासंबंधी राखीने मीडियासोबत बातचीत करताना सांगितले कि, ‘ते म्हणत आहेत की जर तू सलमान खानबद्दल बोललीस तर आम्ही तुला मारून टाकू. पण मी सलमान खानबद्दल बोलणार. कारण तो माझा भाऊ आहे. माझ्या आईची तब्येत खराब असताना त्याने मला मदत केली होती. माझ्या आईला कॅन्सरपासून वाचवण्यासाठी भाईजानने ५० लाख रुपये खर्च केले होते. मी का बोलू नये..? त्याने सिद्धू मुसेवालावर गोळी झाडली आणि त्यानंतर सगळे लोक मेणबत्ती मार्च काढत होते. कोणाच्या मृत्यूनंतर का रडायचं..? तो जिवंत असताना आपण त्याच्यासाठी बोललं पाहिजे ना’. मुख्य म्हणजे यावेळी राखीने तिला मिळालेल्या ईमेलवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by यतीन तांबे (@yatin_tambe_)

याबाबत बोलताना राखीने सांगितले कि, ‘मी कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाहीये. कारण मी घाबरले आहे. मी खूप गोंधळले आहे. या प्रकरणी काय करायला हवं ते मला कळत नाहीये. आता मी हे सर्व देवावर सोडतेय. त्यांनी सांगितलंय, यात पडू नको हि शेवटची वॉर्निंग आहे. जर ऐकायचं नसेल तर तूपण तयार रहा. प्रिन्स मावी असं मेल पाठवणाऱ्याचे नाव आहे. आता जे होईल ते होईल’. राखीला मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव प्रिन्स मावी सांगितले आहे आणि सोबतच आपण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा आणि गोल्डी ब्रार ग्रुपचा मेम्बर असल्याचा त्याने दावा केला आहे. राखीला पहिला मेल १८ एप्रिल रोजी सकाळी तर दुसरा मेल त्याच दिवशी दुपारी आला होता.

Tags: Death ThreatsInstagram Postrakhi sawantSalman KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group