हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या १६ व्या सिजनमध्ये साजिद खान गेल्यापासून बाहेरील जगात शर्लिन चोप्रा चांगलीच चर्चेत आली आहे. साजिदला बाहेर काढा म्हणत तिने त्याच्यावर भयंकर गंभीर आरोप लावले. ज्यामुळे राखी सावंत भडकली आणि तिने शर्लिन चोप्राचा क्लास घेतला. अलीकडे शर्लिनची नक्कल करणारा राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. दरम्यान राखीच्या व्हिडिओनंतर पुन्हा शर्लिननेही राखीला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. यानंतर दोघींमधला वाद संपायचं काही नाव घेईना. उलट दोघींनीही आता पातळी सोडून एकमेकींवर आरोप करायला सुरुवात केली आहे.
नुकताच सोशल मिडीयावर राखी सावंतचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राखीने शर्लिन चोप्रावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राखीचं म्हणणं आहे कि, शर्लिन चोप्रा एक पॉर्न स्टार आहे. मुख्य म्हणजे ती स्वत: स्वतःचे पॉर्न व्हिडिओ तयार करते आणि नंतर तिने जाळ्यात आलेल्या लोकांना ती व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करते. पैसे दे नाहीतर पोलिसांत जाते अशा धमक्या देऊन ती लोकांकडून पैशांची मागणी करते असे म्हणत राखीने शर्लिनला पागल कुत्रीसुद्धा म्हटलं आहे.
राखीच्या या गंभीर आरोपांनंतर शर्लिननेही तिची शस्त्र बाहेर काढली आणि राखीवर आरोप करायला सुरुवात केली आहे. यावेळी शर्लिन चोप्रा म्हणाली कि, ‘राखी सावंत काय करते, तिचे काम दरवर्षी नवीन पती किंवा प्रियकर भाड्याने हायर करणे असे आहे. राखी सावंत काय करते तर ती आलिशान हॉटेल्समध्ये जाऊन प्रायवेट इव्हेन्ट करते आणि करवून घेते. याशिवाय ती सबस्क्रिप्शन बॉयफ्रेंड आणि पती बनवते. यासोबतच वर्षभरात ती या नवऱ्यांना आणि प्रियकरांना कंगाल बनवते. त्यामूळे ते तिला सोडून पळून जातात. हेच तिचे वास्तव आहे.’ अशाप्रकारे साजिदवरुन सुरु झालेली कॅटफाईट आता चिखल फेकीवर उतरली आहे.
Discussion about this post