Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘नकली फातिमा.. तुझ्या टाईमपाससाठी धर्म नाहीयेत’; राखीचा रोजा मोडण्याचे कारण ऐकून भडकले नेटकरी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 1, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rakhi Sawant
0
SHARES
110
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची ड्रामाक्वीन राखी सावंत वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. खाजगी आयुष्यासोबत, अतरंगी चाळे, बिंधास्त वक्तव्य आणि वैवाहिक आयुष्यामुळे राखी सावंत हे नाव सोशल मीडियावर सतत लाइमलाईटमध्ये असत. पहिल्या लग्नात मिळालेल्या धोक्यानंतर तिने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत निकाह केला. इतकंच काय तर दुसऱ्या लग्नानंतर तिने इस्लामिक धर्माचा स्वीकार केला. शिवाय स्वतःच नाव बदलून फातिमा ठेवलं. यानंतर आता रमजानच्या महिन्यात तिने रोजा ठेवला पण आणि मोडला पण. या कारणामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला चांगलाच फैलावर घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सध्या इस्लामिक धर्मियांचा रमजान हा पवित्र महिना सुरू आहे. या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. दरम्यान राखीचा पती आदिल खान तुरुंगात असताना तिने रमजानचे रोजे ठेवले आहेत. याबाबत ती नियमित विविध पोस्ट शेअर करत असतात. हा तिचा पहिला रोजा असून ती काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचे ती म्हणाली होती. ज्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. पण आता तिच्याकडून रोजा मोडल्याचं तिने स्वतःच सांगितलं आहे. मुख्य म्हणजे तिने सांगितलेलं कारण ऐकून नेटकऱ्यांची सटकली आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ती म्हणतेय कि, ‘प्रवासादरम्यान माझ्याकडून रोजा मोडला गेला’. यावर एका पँपराझीने तिला विचारलं कि, ‘कसा काय..? काय झालं..? तू काही खाल्लंस का..?’ तर यावर राखीने चुकून चुइंगगम खाल्ल्याचे सांगितले.

राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून तिच्या या बोलण्याने अनेक जण नाराज झाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी तिच्या वागण्यावर आणि निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत आहेत. यावर एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘तू रोजा ठेवला तरी होतास का..? जो मोडला म्हणतेयस. तू फक्त सर्व धर्मांची मस्करी करतेस’. तर आणखी एकाने म्हटलं, ‘तुझं लग्न तुटलंय.. तर रोजा तुटायचाच होता ना’. तसेच आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘इस्लाम धर्माची आणि रोजाची थट्टा करू नकोस.. अल्लाह तुला माफ करणार नाही’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘खरंच घटियां बाई आहे हि.. आधी हिंदू… मग ख्रिश्चन झाली.. म्हणायची माझं जीजससोबत बोलणं होत… मग पंजाबन- दीपक कलाल’, त्यानंतर मुस्लिम – आदिल.. सगळ्यांचं आयुष्य खराब करून टाकलं हिने.. प्रत्येक धर्माला आपल्या फायद्यासाठी वापरलं.. फेक बाई’.

Tags: Instagram Postrakhi sawantSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group