हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे निधन झाले आहे. यानंतर आता राखीच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. खरंतर तिच्या लग्नाची बाब समोर आल्यापासून रोज नवा ड्रामा सुरु आहे. आता राखी आणि आदिल यांचा घटस्फोट होतो का काय..? अशी चर्चा सुरु झाली आहे आणि याच कारण आहे आदिलचं अफेअर. होय. याबाबत स्वतः राखीनेच खुलासा केला असून तिने त्याला सहज सोडणार नाही असेही म्हटले आहे. शिवाय त्या मुलीलाही तिचं नाव, फोटो आणि व्हिडीओ मीडियासमोर लीक करण्याची धमकी दिली आहे.
गेल्या काही दिवसापुर्वी राखीने तिचा बॉयफ्रेंड आदिलसोबत गेल्याच वर्षी लग्न झाल्याचा खुलासा केला होता. यावेळी तिने लग्नाचा व्हिडीओ आणि फोटो शेअर करून सगळ्यांनाच धक्का दिला होता. मात्र आदिलने इतक्या पुराव्यानंतरही लग्नाबाबत कबुली देण्यास वेळ घेतला. त्यामुळे तो या लग्नापासून खुश नसल्याचं बोललं गेलं. मात्र काही दिवसांनी आदिलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून राखीसोबत झालेल्या लग्नाचा स्वीकार केला. तोच आदिल आता राखीला सोडून दुसऱ्याच मुलीसोबत व्यस्त असल्याचा आरोप करत राखीने आपले लग्न धोक्यात असल्याचे म्हटले आहे.
राखीने पॅपराझींसमोर आदिलवर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली कि, ‘आदिलला इंडस्ट्रीत येवून स्टार बनायचं होतं. त्यामुळे त्याने माझा वापर केला. त्याला केवळ स्टार बनायचं होतं. तो खुप खोटं बालतो. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. त्याने त्या मुलीला ब्लॉक केलं नाही आणि आता ती मुलगी त्याला ब्लॅकमेल करतेय. मी त्याला सोडणार नाही. मला तलाकची धमकी देवू नको’. याशिवाय तिने त्या दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याचेही आरोप करताना तिचा स्पष्ट उल्लेख केला नसला तरीही तिला सगळ्यांसमोर आणण्याची खुली धमकी दिली आहे.
Discussion about this post