हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा आता शेवटचा आठवडा राहिला आहे. त्यामुळे या घरात स्पर्धकही जेमतेम उरले आहेत. अपूर्वा नेमळेकर, किरण माने, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर आणि राखी सावंत एव्हढेच स्पर्धक आता उरले आहेत. पण शेवटी बिग बॉसचंच घर ते.. इथे भांड्याला भांडं कसंही लागतंच. व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये अपूर्वा नेमळेकर आणि आरोह वेलणकर यांच्यामध्ये छोट्या बातचीतवरून मोठं भांडण होताना दिसलं. पण यावेळी राखीनं जे काही पाऊल उचललं ते पाहून सगळ्यांनाच धक्का लागला आहे.
कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये आपण पाहून शकतो कि, बिग बॉस मराठीचे स्पर्धक आरोह वेलणकर आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यामध्ये कोणत्या तरी कारणामूळे जोरदार बाचाबाची सुरु आहे. दरम्यान आरोह अपूर्वाला वाट्टेल तसं काही बाही बोलताना दिसत आहे अशावेळी गप्प बसेल ती अपूर्वा थोडीच. मग तीसुद्धा पलटवार करताना बरंच काही बोलताना दिसते आहे. पण हा प्रोमो पाहण्याची मजा तर शेवटी आहे. या भांडणात अचानक राखी एंट्री करते आणि तिची ऍक्शन पाहून काय रिऍक्शन द्यायचं याबाबत आरोह, अपूर्वा आणि घरातले सगळेच प्रश्नात पडतात.
त्याच झालं असं कि आरोह अपूर्वाला म्हणतो, ‘स्वतःला कोण समजतेस तू नेमळेकर?’ त्यावर अपूर्वा म्हणते, ‘तू कोण आहेस ना ते पहा आधी.. तू मला काय सांगतोस.’ तर अपूर्वाचं प्रत्युत्तर ऐकून आरोह म्हणतो, ‘चल चल निघ. यावर अपूर्वाही त्याला म्हणतो, ‘स्वतः काय बोलतो, हड- तूडची भाषा करतो.’ यावर पुन्हा आरोह चिडून म्हणतो कि, ‘फालतू बाई आहेस तू, मूर्ख बाई आहेस एक नंबरची. हे ऐकून राखी सावंतचा पारा चढतो आणि ती रागाच्या भरात थेट आरोहच्या तोंडावर पाणी फेकते आणि म्हणते, ‘फालतू बाई, कधीही म्हणायचं नाही’. राखीची कृती पाहून आरोह हडबडतो. तर अपूर्वालाही धक्का बसतो. हा प्रोमो राखीमुळे प्रचंड व्हायरल होत आहे.
अनेकांनी या कृतीसाठी राखीचे समर्थन करीत तिचे कौतुक केले आहे. पण मुळात आरोह राखीला फालतू बाई म्हणतो आणि यामुळे तिचा पारा चढतो. आपला राग व्यक्त करण्यासाठी राखी त्याच्या तोंडावर पाणी फेकते आणि दुसरीकडे प्रसाद अपूर्वाला काहीतरी बोल म्हणतो आणि अपूर्वा म्हणते, ‘मी काय सांगू. तो याच लायक आहे.. राखी बरोबर करतेय.’
Discussion about this post