हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री राखी सावंत सध्या बिग बॉसच्या घरातली बेस्ट एंटरटेनर म्हणून ओळखली जातेय. पण तिचा पती रितेश मागच्या अनेक दिवसांपासून सर्वांसाठीच एक न उलगडलेलं कोडं आहे. राखीचं म्हणणं आहे की, ती विवाहित आहे. तिचं लग्न रितेशशी झालं आहे. पण ना त्याचा कोणताही फोटो तिने शेअर केला आहे ना त्याला कोणी प्रत्यक्षात पाहिलं आहे. पण आता राखीचा भाऊ राकेशनं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या नवऱ्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार राखी सावंतचा भाऊ राकेश सावंतने एका मुलाखतीत सांगितले की, मी पुन्हा एकदा आणि शेवटचे स्पष्ट करू इच्छितो की माझी बहिण राखी सावंत विवाहित आहे आणि माझे जीजू राकेश कल्पनात्मक पात्र नाही. ते खऱ्या जीवनात आहेत आणि पोलंडमध्ये राहतात.
राकेशने पुढे सांगितले की, जेव्हा लग्न झाले होते तेव्हा कुटुंबातील लोक उपस्थित होते. माझे मामा आणि मामीदेखील लग्नाला गेले होते. राखीला लग्नाच्याबाबतीत कोणतेच खोटे बोलण्याची गरज नाही. जेव्हा तिने लग्ने केले नव्हते तेव्हा तिने कधीच विवाहित असल्याचे नाटक केले नव्हते. मग आता जेव्हा तिचे लग्न झाले आहे तेव्हा तिने सर्व जगाला सांगितले आहे.
राखीचा पती रितेश कोणासमोर का येत नाही असा प्रश्न विचारल्यावर राकेश म्हणला, ‘हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. आतापर्यंत त्यांना आपली ओळख कोणासमोर येऊ द्यायची नव्हती. त्यांना त्यांचं पर्सनल लाइफ कोणसमोर दाखवायला आवडत नाही. पण बिग बॉस मेकर्सनी त्यांना भारतात येण्यासाठी अप्रोच केलं आहे आणि ते लवकरच सर्वांसमोर येतील. त्यांनी आता सर्वांसमोर यायला हवं असं मलाही वाटतं.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’
Discussion about this post