Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राखी सावंतच्या आईचे ऑपेरेशन यशस्वीरित्या पूर्ण; सलमान आणि सोहेल खान यांचे मानले आभार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 20, 2021
in फोटो गॅलरी, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Rakhi_Salman_Sohail
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राखी सावंतची आई गेल्या बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरसोबत सामना करतेय. तिच्या आईवर आज मोठी शस्त्रक्रिया झाली. हि शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून डॉक्टरांनी त्यांच्या शरीरात असलेला कॅन्सर ट्युमर बाहेर काढला आहे. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. याबाबत राखीने मीडियासोबत बोलताना माहिती दिली आहे. शिवाय सलमान खान आणि सोहेल खान यांचे तिने मनापासून आभार मानले आहेत. सलमान आणि सोहेल यांच्यामुळेच माझ्या आईचे ऑपरेशन झाले. त्यांच्यामुळेच माझी आई ठीक आहे. देवाने प्रत्येक घरात सलमान-सोहेल सारखी मुलं जन्माला घालावीत, असे राखीने म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अगदी काहीच तासांपूर्वी तिने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात राखी आणि तिची आई दोघीही अत्यंत भावुक झाल्याचे दिसत होते. त्यात राखी सावंत म्हणतेय, आज माझ्या आईचे ऑपरेशन आहे. कॅन्सरचा ट्यूमर डॉक्टर काढून टाकतील. मी खूप आनंदात आहेत. आई, आता तुला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुझ्या शरीरातला कॅन्सर नेहमीसाठी संपणार आहे. मी सलमानला यासाठी धन्यवाद देईल. तूच माझ्या आईचा जीव वाचवला. परमेश्वरामुळे आणि तुझ्यामुळेच आईचे इतके मोठे ऑपरेशन होतेय. तू आम्हाला जगातील सर्वोत्तम डॉक्टर आम्हाला दिलास. मी परमेश्वराला प्रार्थना करते की, भारताच्या प्रत्येक घरात सलमान व सोहेलसारखा मुलगा जन्मास येवो. सलमानच्या कुटुंबाचेही मी आभार मानते़ तुम्ही आमच्यासाठी देवदूत बनून आलात.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

 

या व्हिडीओत राखीची आईदेखील भावूक झाल्या असल्याचे दिसतेय. हॉस्पीटलच्या बेडवरून त्या म्हणत होत्या, ‘पैसे नव्हते़ मी अशीच मरणार का? ही चिंता होती. अशावेळी परमेश्वराने सलमान खानला एंजल बनवून पाठवले. माझ्यासाठी तो उभा झाला. आज त्याच्यामुळे माझे ऑपरेशन होतेय. सलमान तू सदा आनंदी राहशील. तुझ्यावर तुझ्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करते. माझा परमेश्वर तुला सांभाळेल.’

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंत बिग बॉस १४ मध्ये स्पर्धक म्हणून असताना तिला आईची किमोथेरपी व कॅन्सरबद्दल माहित झाले होते. तिची आई गेल्या अनेक दिवसांपासून पोटाच्या कॅन्सरने ग्रस्त आहे. आईच्या उपचारासाठी राखीला पैशांची गरज होती. या पैशासाठीच तिने १० लाख रूपये घेऊन बिग बॉस हा शो सोडला होता. याशिवाय सलमान व सोहलने राखीची मदत केली. सलमानने राखीच्या आईच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला. आज राखीच्या आईवर होणारी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यामुळे राखी आनंदी आहे. तसेच तिने अक्षरशः जमिनीवर बसून हाथ जोडून खान भावंडांचे आभार मानले आहेत. तिने आईच्या शरीरातुन काढलेल्या ट्युमर चा व्हिडीओ शेअर करीत डॉक्टर आणि खान भावंडाना पुन्हा एकदा धन्यवाद म्हटले आहे.

Tags: celebrity photographerInstagram PostMother - Daughter Relationrakhi sawantSalman Khansohail khanviral bhayaniViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group