हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय अशा दोन कलाकारांचे कमाल सिनेमे नुकतेच प्रदर्शित झाले. एक म्हणजे बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक गॉड’. तर दुसरीकडे बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभियन्ता अक्षय कुमारचा ‘रामसेतू’. हे दोन्ही चित्रपट बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडवर भारी पडतील अशी आशा होती. पण इथेतर बॉलीवूडला टॉलिवूडकडून जोरदार दणका मिळाला आहे. टॉलिवूडचा ‘कांतारा’ हा चित्रपट बघता बघता २ आठवडे होऊनही बॉक्स ऑफिस गाजवतो आहे. ज्यामुळे बॉलिवूडचे नवे सिनेमे येऊनही प्रेक्षकांचा कल मात्र टॉलिवूडकडेच आहे.
तब्बल २ आठवड्यांपूर्वी टॉलिवूडचा ‘कांतारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून अद्यापही हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवतोय. एव्हाना या चित्रपटाने विक्रमी कमाई केल्याचे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे साऊथमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने शंभर कोटींचा आकड़ा आधीच पार केला होता.
त्यानंतर आता तो हिंदीत प्रदर्शित झाला आणि इथेही काही वेगळं चित्र दिसत नाहीये. त्यामुळे एकंदरच टॉलीवूडपुढे बॉलीवूडचं काही खरं नाही बाबा.. हेच काय ते खरं. या शुक्रवारी अक्षय कुमारचा ‘रामसेतू’ तर अजय देवगणचा ‘थँक गॉड’ प्रदर्शित झाला. या चित्रपटांना पहिले २ दिवस प्रेक्षकांचा बरा प्रतिसाद मिळाला. पण आता प्रेक्षकांनी या चित्रपटाऐवजी साऊथचा ‘कांतारा’ पाहणे पसंत केले आहे.
माहितीनुसार, ओपनिंग डे’ला अजय आणि अक्षयच्या चित्रपटांनी चांगली कमाई केली. पण आता येणारे पुढील दिवस जास्त कसोटीचे आहेत. कारण सलग २ आठवडे बॉक्स ऑफिस गाजवणारा कांतारा अजूनही स्क्रीनवर आहे. तर दुसरीकडे सुबोध भावे आणि शरद केळकर यांच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटासमोर या चित्रपटांना टिकायचे आहे. तसे पाहता ‘कांतारा’ समोर ‘हर हर महादेव’ला प्रेक्षकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे.
मात्र कांतारामुळे रामसेतू आणि थँक गॉडच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये थेट २५ ते ३० टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत रामसेतूचे एकुण कलेक्शन हे २५.८५कोटी रुपये इतके झाले आहे. तर थँक गॉडचे एकूण कलेक्शन १५.२५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय मराठी चित्रपट हर हर महादेवने आतापर्यंत ३.२० कोटींची कमाई केली आहे.
Discussion about this post