हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या काळानंतर सिने इंडस्ट्रीला पूर्ववत व्हायला बराच वेळ लागला. यानंतर आता कुठे चांगले दिवस सुरु होत आहेत असे म्हणताच बॉलिवूड इंडस्ट्रीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेंड उठला आणि अनेक सुपर स्टार कलाकारांचे चित्रपट डब्यात गेले.
मात्र एव्हढं सगळं असूनही बाॅक्स ऑफिसवर ४०० कोटींची कमाई करत ब्रह्मास्त्र या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले. हा चित्रपट आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. तो कधी आणि कोणत्या ओटीटीवर पाहता येईल हे जाणून घेऊया.
बाॅक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई करणारा अलीकडच्या काळात प्रचंड गाजलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट येत्या दिवाळीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. दिवाळीमध्ये प्रेक्षकांना OTT वर फुल मनोरंजनाची काहीच कमी पडू नये म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकूण ५ दर्जेदार चित्रपट रिलीज होणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र. त्यामुळे आता ज्यांनी अजून ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिलेला नाही ते आता घरी बसून हा चित्रपट पाहू शकणार आहेत.
हा चित्रपट नेमक्या कोणत्या तारखेला रिलीज होणार..? याबाबत अजून घोषणा केलेली नाही. मात्र हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशीही चर्चा आहे. ब्रह्मास्त्रच्या रिलीजआधी मोठा वाद झाला होता. नेटकरी या चित्रपटावर बहिष्कार टाका म्हणत होते. तरीही या चित्रपटाने तुफान कामे केल्याचे चित्र दिसले. या चित्रपटात रणबीर, आलियासह, अमिताभ बच्चन, नागार्जुना आणि मौनी रॉय हेदेखील अन्य मात्र मुख्य भूमिकेत आहेत.
Discussion about this post