Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘रंग माझा वेगळा’ मालिकेने पूर्ण केले 800 एपिसोड; कलाकारांनी मानले प्रेक्षकांचे आभार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 26, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rang Maza Vegla
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील अत्यंत लोकप्रिय आणि घराघरात पाहिली जाणारी मालिका म्हणजे रंग माझा वेगळा. या मालिकेचं शीर्षकगीत, कथानक, कलाकार या प्रत्येकाशी प्रेक्षकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. मालिकेतील मुख्य पात्र दीपा आणि कार्तिक यांच्या डोळ्यात पाणी आलं तर घराघरातील माता भगिनींचे देखील डोळे पाणावतात. अशा या लाडक्या मालिकेने नुकतेच ८०० एपिसोड पूर्ण केले आहेत. अशी एक मोठी मजल या कार्यक्रमाने मारली आहे असे म्हणायला हरकत नाही. या निमित्ताने कलाकारांनी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या मालिकेने गेल्या ३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. दीपा- कार्तिकची जोडी आणि अभिनेत्री हर्षदा खानविलकरने साकारलेली सौंदर्या इनामदार या पात्रांवर प्रेक्षकांचं विशेष प्रेम आहे. मागील काही महिन्यांपासून मालिकेने TRPच्या शर्यतीत पहिला नंबर कायम राखला आहे. गुरुवारी २५ ऑगस्ट रोजी या मालिकेचा ८०० वा एपिसोड प्रसारित झाला. यानंतर मालिकेच्या टीमने सेटवर केक कापून जंगी सेलिब्रेशनसुद्धा केलं.

दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने एक खास व्हिडीओ शेअर करत मालिकेला दिलेल्या प्रेमासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तर मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या दीपा- कार्तिक म्हणजेच अभिनेता आशुतोष गोखले आणि रेश्मा शिंदे यांनीही प्रेक्षकांचे आभार मानले.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

सध्या या मालिकेच्या कथानकाविषयी अपडेट द्यायचे म्हटले तर, दीपिकाला दीपाच आपली खरी आई आहे हे समजलंय. यावेळी दीपा तिला मी तुझी खरी आई आहे असे सांगताच दीपिका तिला आई म्हणून स्वीकारते. आता दीपाला तिच्या दोन्ही मुली तर मिळाल्या पण त्या मुलींना आई आणि बाबा दोघे मिळतील का…? असा सवाल प्रेक्षकांना पडला आहे.

Tags: Instagram Postmarathi serialRang Maza Veglastar pravahViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group