Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आम्हाला भीक नको.. काम करायचे आहे’; कलावंतांच्या अस्तित्वासाठी महाराष्ट्रात यल्गार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 30, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
Meghna Ghadge
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून अनेक व्यवसाय ठप्प आणि लोक बेरोजगार झाले. मात्र आता कुठे लॉकडाऊनमधील शिथिलतेमुळे लोकांनी श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र लोककलावंतांची आणि रंगकर्मींची अद्याप चिंता मिटलेली नाही. अजूनही हे कलाकार काम सुरु होण्याच्या आशेवर जगत आहेत. पुन्हा नाट्यगृहे सुरु व्हावी आणि तिसरी घंटा पुन्हा कानी पडावी यासाठी सरकारकडे अनेक कलाकारांनी पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनही यावर सरकारने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हे कलाकार महाराष्ट्रभर रंगकर्मी आंदोलन करणार आहेत. आमच्या हक्काचे व्यासपीठ जर नेतेमंडळी त्यांच्या प्रचारासाठी वापरत असतील तर आम्ही आता गप्प बसणार नाही, असा इशारा रंगकर्मींनी दिला आहे. कलावंतांचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे रंगकर्मी आंदोलन करणार आहेत. याच आंदोलनाला अभिनेत्री मेघा घाडगेने पाठिंबा दिला आहे.

अभिनेत्री मेघा घाडगेने फेसबुक पोस्ट करीत म्हटले कि, एक काळ होता, अगदीच तुटपुंज्या पाकिटावर समाधानी होणारे आम्ही.अ लीकडे मायबाप रसिक प्रेक्षकांच्या तो टाळ्यांचा आवाज कानी ऐकू येत नाही. अनुभवी मार्गदर्शकाची ती पाठीवरची पडलेली थाप गेला काही काळ हरवून गेली आहे.. तिसरी घंटा ऐकायची आहे .. पण तीच घंटा आज धूळ खात पडली आहे. मायबाप सरकारला एक विनवणी करतो, राजकारण्यांचे कार्यक्रम आमच्या नाट्यगृहात करता आणि आम्ही कलाकार मात्र आमच्या घरात शिरायचे नाही. हा कोणता कायदा. आम्हाला भीक नको, काम करायचे आहे .

ती पुढे म्हणाली की, आम्हाला आनंद तेव्हा मिळतो जेव्हा प्रेक्षक आमच्या कामाच्या मोबदल्यात टाळ्यांचा वर्षाव करतो. आम्ही सुखी तेव्हा दिसतो. जेव्हा आमच्या कामातून प्रबोधन होते,आज या महामारीच्या काळात सगळ्यांना सवलती दिल्या आहेत. गरिबांना जेवण, श्रीमंतांना वर्क फ्रॉम होम, घरकाम करणारे, माताडी कामगारांना,रिक्षा चालकांना सगळ्यांना एक आई सारखे आपण आपल्या पदराखाली जागा दिली. मग आम्ही काय पाप केले. या मातीशी आम्ही प्रामाणिक आहोत. या महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रा पलीकडे घेऊन गेलो. तुमच्या ही कामात हक्काने आम्हाला बोलावता. मग तो प्रचारासाठी असो वा सेलिब्रिटी म्हणून. त्या तुझ्याच लेकराला विसरलास. आता तूच आमच्याशी अस वागणार तर आम्ही कोणाकडे पाहायचे. म्हणून तुला आमची आठवण करून देण्यासाठी, आमचं अस्तित्व टिकुन राहावे म्हणून, आम्ही आंदोलन करतो आहे. रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र जागर रंगकर्मींचा उदो उदो. हे आंदोलन सध्या राज्यभरात आपल्या अस्तित्वासाठी आणि काम मिळावे या अपेक्षेपोटी रंगकर्मी करताना दिसत आहेत.

Tags: Lavani Artistmegha ghadgeSocial Media PostTheater Artists agitationviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group