Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री रसिका सुनीलची डोळस नवरात्र; 250 नेत्रहीन मुलींसोबत धरला गरब्याचा फेर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 26, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rasika Sunil
0
SHARES
125
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. या नऊ दिवसात देवी आईच्या ९ आदिशक्ती स्वरूपाची पूजा केली जाते. या दिवसात स्त्रिया ९ रंगांचे आवर्जून पालन करतात. इतकंच काय तर.., या दिवसात हमखास आनंद देणारी बाब म्हणजे गरबा आणि दांडियाची धूम. कित्येक सण येतात आणि जातात. ते अनुभवण्याची संधी सगळ्यांकडे असते. पण काहींसाठी ते सण अनुभवणेसुद्धा एक आव्हान असते. या आव्हानांसाठी जर आपण पुढाकार घेऊन कुणाच्या आयुष्यात रंग भरू शकलो तर त्याहून दुसरा आनंद आणि सण तो काय.. म्हणूनच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका फेम अभिनेत्री रसिका सुनीलने २५० नेत्रहीन मुलींसोबत गरब्याचा आनंद लुटत त्यांच्याही ओंजळीत आभाळभर आनंद दिला आहे. यामुळे तिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

अभिनेत्री रसिका सुनीलच्या या कृतीचे अनेकांनी विविध माध्यमातून विशेष कौतुक केले आहे. रसिका सुनीलने दादर येथील कमला मेहता या अंध मुलींच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या गरब्यासाठी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी मुलींसोबत दांडिया खेळताना तिने २५० अंध मुलींच्या रिंगणात गरब्याचा फेर धरला. हा अनुभव तिच्यासाठीदेखील फारच विलक्षण आणि अभिमानास्पद होता. यावेळी तिने माध्यमांशी बोलताना या क्षणाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

माध्यमांशी बोलताना अभिनेत्री रसिका सुनील प्रतिक्रिया देत म्हणाली कि, ‘मी लहानपणापासूनच नवरात्री साजरी करतेय. पण यंदाचा नवरात्रोत्सव माझ्यासाठी फारच विलक्षण आणि अविस्मरणीय आहे. मी इतक्या सुंदर आणि बुद्धिवान मुलींच्या सानिध्यात आज काही क्षण घालवले. माझ्यासाठी त्या नवदुर्गा असून एक डोळस नवरात्र मी या निमित्ताने साजरी केली आहे.’

याशिवाय अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या शुभ्र रंगाचे पालन केल्याचे काही खास साडीतील फोटो शेअर केले आहेत. सोबत तिने चाहत्यांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Instagram PostNavratra 2022Rasika SunilViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group