हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले ३’ थरारक कथानकमुळे अनेको घराघरांत पाहिली जाते. मालिकेतील पात्र आणि मालिकेतील रंजक वळणे प्रेक्षकांना मालिकेशी बांधून ठेवत असतात. शिवाय मालिकेमध्ये अनेक रहस्यमय घटना वारंवार घडताना दिसतात. त्यामुळे मालिकेबाबत प्रेक्षकांना अधिकच उत्सुकता राहते. पहिल्या दोन भागांना चाहत्यांकडून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. मात्र तिसरा भाग सुरु झाला आणि याचदरम्यान कोरोनामुळे चित्रीकरण थांबविण्यात आले. पण आता पुन्हा एकदा हि मालिका आजपासून सुरु होतेय.
आजपासून म्हणजे १६ ऑगस्ट २०२१ पासून ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका पुन्हा एकदा झी मराठीवर प्रक्षेपित होणार आहे. दरम्यान नव्या वेळेनुसार सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता या मालिकेचं प्रसारण होणार आहे. याबाबत नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला असून, यात अण्णा नाईक आणि शेवंता दिसत आहे. तसेच ‘याच संसाराच्या स्वप्नामुळेच तर आज ही पाळी आली पण आता नव्याने सुरु होणार तोच रात्रीचा जीवघेणा खेळ…’ अशी टॅगलाईनसुद्धा सोबत देण्यात आली आहे.
रात्रीस खेळ चाले ३ या थरारक मालिकेतील ‘अण्णा नाईक’, ‘माई’, ‘शेवंता’, ‘पांडू’ या पात्रांनी रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. त्यामुळे प्रेक्षक मोठ्या आतुरतेने आपल्या आवडत्या पात्रांची वाट बघत आहेत. गेल्या आठवड्यात पांडूची भूमिका साकारणारा अभिनेता आणि मालिकेचा लेखक प्रल्हाद कुडतरकर याने ‘रात्रीस खेळ चाले ३’ लवकरच सुरु होणार असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हा पासून प्रेक्षक ‘रात्रीस खेळ चाले ३’ या थरारक मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. मुख्य म्हणजे बहू प्रतिक्षीत शेवंताचे पात्र देखील येत्या भागांमध्ये लवकरच समोर येणार आहे.
	
					
		
		
		
    
    
    
			
                                    
            
Discussion about this post