हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इतिहासाच्या गर्भात दडलेल एका गावाचं थरारक रहस्य. ज्यात विविध भावभावनांचा खेळ रंगतो आणि त्यातून समोर येत एक ‘रौद्र’ रूप. हे रूप नेमकं आहे तरी कोणाचं…? याची रंजक तेवढीच अकल्पित कथा जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी ‘रौद्र‘ हा आगामी मराठी चित्रपट पाहायला तयार व्हा. कारण एम.जी पिक्चर्स निर्मित आणि रविंद्र शिवाजी लिखित- दिग्दर्शित ‘रौद्र’ हा चित्त थरारक रहस्यमयी चित्रपट येत्या १ एप्रिल २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.कंपनीने ‘रौद्र’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. राहुल पाटील आणि उर्मिला जगताप ही नवीकोरी फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्यासोबत दीपक दामले, अनिता कोकणे, अमित पडवणकर, ईशान गटकळ या कलाकारांच्या या चित्रपटात अत्यंत महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा मंगेश बाळासाहेब गटकळ यांची आहे. तर पटकथा आणि संवाद रविंद्र शिवाजी यांचे आहेत. तसेच मंगेश बाळासाहेब गटकळ या चित्रपटाचे निर्माते असून सहनिर्माते समीर किसन गाडे आहेत. हर्षद गोलेसर, वैष्णवी अडोदे, शुभांगी केदार, शिरीष पवार या नवोदित पण प्रसिद्ध गायकांनी यातील गाणी गायली आहेत. तर संगीत अक्षय जाधव यांनी दिले आहे आणि छायांकन स्वप्निल केदारेसह संकलन आकाश मोरे यांनी केले आहे.
वडगांव… हे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव आहे. दरम्यान १९७० सालचा काळ दर्शविला आहे. यात त्रिंबक कुरणे नामक जनगणना अधिकारी जनगणनेच्या निमित्ताने वडगांवला येतो. या त्रिंबकला इतिहासाची आवड असते. गावातील नानासाहेब कुलकर्णीं हे प्रतिष्ठित व्यक्ती असतात. ते त्याच्या राहण्याची सोय त्यांच्या जुन्या वाड्यावर करतात. या वाड्याबद्धल विविध अफवा असतात. हा वाडा जितका भव्य तितका भयानक असतो. काहीं दिवसात त्रिंबकला येथे विचित्र आवाज येतात. दरम्यान नानासाहेबांकडे एक पुरातन बखर असल्याची माहिती त्रिंबकला मिळते. यात कोडी असतात ज्यामार्फत रहस्य उलघडणार असते. या नायिकेच्या मदतीने कोडयामधील महत्त्वाचा धागा त्याचा हाती लागतो आणि पुढे होतो विश्वासघात. ज्यामुळे विनाशकाली आणि ‘रौद्र’रूप पहायला मिळते. हे नक्की काय आहे..? हे जाणून घ्यायचे असेल तर हा चित्रपट जरूर पहा.
Discussion about this post