हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनने आतापर्यंत विविध चित्रपट, वेब सिरीज यांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यामुळे गेल्या कित्येक काळापासून तिचा चाहता वर्ग दिवसागणिक वाढताना दिसतो आहे. अनेक भूमिकांसाठी विविध पुरस्कार जिंकल्यानंतर आता रविनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आज गुरुवारी २२ सप्टेंबर २०२२ रोजी अभिनेत्री रवीना टंडन हिची ‘महाराष्ट्र वन्यजीव सदिच्छा दूत’ म्हणून शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. हा एक वेगळा सन्मान आणि जबाबदारी असल्याचे रवीनाने म्हटले आहे.
महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अभिनेत्री रवीना टंडनला नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, ‘आम्ही रवीना यांच्या वन्यजीवांबद्दलची आवड आणि प्रेम याचे साक्षीदार आहोत. अनेक प्रसंगी महाराष्ट्रासाठी वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून त्या अतिशय सद्भावनेने कार्य करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.’ याशिवाय अभिनेत्री रवीना टंडनने या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली कि, ‘वन्यजीव सदिच्छा दूत’ म्हणून काम करणे हा एक सन्मान आहे आणि मला महाराष्ट्र वन विभागाने तो देऊन काम करण्याची संधी दिली.. हा मान दिला यासाठी मी आभारी आहे.’
इंस्टाग्रामवर या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रवीनाने लिहिले आहे कि, ‘आम्ही निसर्गाच्या संवर्धनासाठी आणि लोकांना अधिक शाश्वत जगण्यासाठी प्रेरित करण्यासाठी कार्य करत राहू. आपल्या वन्यजीवांसाठी जागरुकता आणि अनुकूल अधिवास निर्माण करण्यात मदत करण्यासाठी मी महाराष्ट्र वन विभागासोबत ‘वन्यजीव सदिच्छा दूत’ म्हणून काम करण्यास उत्सुक आहे. विकास आवश्यक आहे, त्याचप्रमाणे ताजी हवा आणि निरोगी ग्रहाची गरज आहे, जर आपण हातात हात घालून काम करायला शिकलो तर दोन्ही साध्य करता येऊ शकतात आणि प्रगतीही होऊ शकते. #greenplanet #maharashtragoodwillwildlifeambassador ही पदवी नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील आणि मला मिळालेल्या सन्मानाप्रमाणे जगण्यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार आणि त्यापलीकडे सर्व काही करेन.’
अभिनेत्री रवीना टंडनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती आघाडीच्या चित्रपटांचा भाग राहिली आहे. यामध्ये तिने अलीकडेच पॅन इंडिया चित्रपट ‘KGF चॅप्टर 2’ मध्ये दाक्षिणात्य अभिनेता यश आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाने अनेक विक्रम तोडत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. यानंतर लवकरच ती संजय दत्त, पार्थ समथान आणि कुशली कुमार यांच्यासोबत फॅमिली ड्रामाँ ‘घुडचडी’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट बिनॉय गांधी दिग्दर्शित करत आहेत आणि टी-सीरीज, कीप ड्रीमिंग पिक्चर्स याची निर्मिती करत आहेत.
Discussion about this post