Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

महाराष्ट्र शाहीर : स्वाभिमानी लोककलावंताचा हृदयस्पर्शी जीवनप्रवास

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 29, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Maharashtra Shahir
0
SHARES
435
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राला लोककलेचा अजोड वारसा लाभला आहे. लावणी, शाहिरी, कीर्तन, अभंग, गवळणी अशा अनेक कला प्रकारांची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला आहे. या कलेचा डंका जगभर मिरवणारे कलाकारसुद्धा महाराष्ट्राच्या मातीत घडले आहेत. शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे हे त्यापैकीच एक. याच कृष्णराव साबळेंवरील जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर‘ शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित झाला. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी यांनी शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. शाहीर साबळे यांचं कलासक्त जीवन हा जरी चित्रपटाचा केंद्रबिंदू असला तरी १९३० ते २००० या कालावधीत महाराष्ट्रात सांस्कृतिक- राजकीय अंगाने घडलेल्या भारतीय स्वातंत्र्यलढा, अस्पृश्यांचा मंदिर प्रवेश, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शिवसेनेचा दसरा मेळावा, मुंबई आणि मराठी माणूस या घटनांची उजळणी चित्रपटात आलेली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

शाहिरी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर डफ, तुणतुण, पहाडी आवाज आणि शिवाजी महाराज या गोष्टी आवर्जून येतात. शिवजयंतीला स्पीकर लावून अनेक ठिकाणी शाहिरी पोवाडे ऐकत राहणं हे काम आपण वर्षांनुवर्षं करत आलो. मात्र शाहिरी लोककलावंताचं जगणं रुपेरी पडद्यावर आपण क्वचितच अनुभवलं. महाराष्ट्रात शाहिरी कला प्रकाराने लोकांच्या मनावर गारुड करणाऱ्या शाहीर साबळेंचा हा प्रवास केदार शिंदेंनी चांगल्या पद्धतीने दाखवला आहे. लोककलावंताला येणाऱ्या अडचणी, त्यांना वास्तव परिस्थितीचं असलेलं भान आणि त्यातून मार्ग काढण्याची त्यांची धडपड या चित्रपटातील गोष्टी प्रेक्षकाला खिळवून ठेवणाऱ्या आहेत. शिवाय भान देणाऱ्याही आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

आपल्यापैकी प्रत्येकाने शाहीर साबळेंची काही ना काही गाणी ऐकली असतील. फक्त ती गाणी त्यांची म्हणून आपल्याला माहीत नाहीत. स्पॉटिफाय किंवा जिओ सावनवर जाऊनसुद्धा आपण शाहीर साबळे असं कधी सर्च केलं नसेल. या चित्रपटाच्या निमित्ताने साबळे यांनी केलेल्या दर्जेदार गाण्यांची पुन्हा एकदा उजळणी करता येईल. प्रतिकांचा वापर ही चित्रपटातील आणखी एक जमेची बाजू. साबळेंच्या हातातील अंगठी, त्यांची जीप, वापरायचे कपडे, डफ, चष्मे या गोष्टी साबळेंचं त्यावेळचं रूप डोळ्यांसमोर आणायला मदत करतात. स्वतःच्या पडत्यास काळातही लोकांना जागरुक करण्याची शाहिरांची तळमळ, धडपड कशी होती याची दृश्य चित्रपटात समर्पकपणे आली आहेत.

View this post on Instagram

A post shared by महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer (@maharashtra_shaheer_the_film)

उडत्या चालीची, रोमँटिक किंवा अगदी हिंदी-इंग्लिश-पंजाबी गाणी ऐकण्याची सवय झालेल्या तिशी-पस्तिशीच्या आतील तरुणाईला शाहिरीची, मराठी गाण्यांची बहुविधता, त्यांचं रांगडेपण आणि ते तयार होतानाचा प्रवास अनुभवायचा असेल तर महाराष्ट्र शाहीर चित्रपट त्यांच्यासाठी पर्वणी आहे. यंदाच्या महाराष्ट्रदिनी महाराष्ट्राच्या एका तगड्या लोककलावंताचं जगणं लोकांसमोर उलगडून दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न केदार शिंदे यांनी केला आहे.

View this post on Instagram

A post shared by महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer (@maharashtra_shaheer_the_film)

अभिनयाच्या पातळीवर बोलायचं झाल्यास अंकुश चौधरी याने शाहीर साबळे यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. तरीही ओरिजिनल साबळेंचा रांगडेपणा चित्रपटात मिसिंग वाटतो. स्वतःच्या कन्येला (सना शिंदे) शाहिराच्या पत्नीची चांगली भूमिका देऊन केदार शिंदे यांनी तिचं यशस्वी पदार्पण घडवून आणलं आहे. याशिवाय निर्मिती सावंत, अश्विनी महांगडे आणि इतर सहकलाकारांनी आपल्या भूमिका व्यवस्थित केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)

संगीत ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. अजय-अतुल यांचं दमदार संगीत चित्रपटाला लाभलं आहे. गाऊ नको किसना हे जयेश खरे या चिमुरड्याने गायलेल्या गाण्याची तसेच श्रेया घोषाल यांनी गायलेल्या मधुमास तुझा या गाण्याची रंगत चित्रपट पाहताना अधिक जाणवते. अजय गोगावले यांनी गायलेलं जय जय महाराष्ट्र माझा हे गाणंही अप्रतिम झालं आहे. याशिवाय कॅमेरा आणि लोकेशन्स यामुळं चित्रपट जिवंत बनला आहे, त्यातून जुना काळ अनुभवता येतोय. माय मराठीविषयी, महाराष्ट्राविषयी आणि लोककलेविषयी प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने किमान एकदा बघावा असा हा चित्रपट नक्कीच आहे.

समीक्षक – योगेश जगताप

रेटिंग – 4.5/5

Tags: Ankush ChoudhariInstagram PostKedar shindeMaharashtra ShahirMovie ReviewSana Shinde
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group