हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीती मामा आणि नाना या दोन व्यक्तींना अतिशय मान आहे. कारण अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांनी मराठी सिनेसृष्टीला सोन्याचे दिवस दाखवण्यात आपल्या आयुष्याची अनेक वर्ष दिली आहेत. त्यात नुकतीच मामांची पंच्याहत्तरी झाल्यमूळे मामांच्या आयुष्यातील लहानातील लहान प्रसंग आणि व्यक्तींविषयी बरीच चर्चा आहे. आज २०२२ सालातील मैत्रीचा दिवस अर्थात तरुणाईचा फ्रेंडशिप डे आहे. तर आज आपण लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्या व्यतिरिक्त मामांच्या आयुष्यात खास मित्र म्हणून असणाऱ्या नानांविषयीचा किस्सा जाणून घेणार आहोत.
नाना आणि मामा म्हणजेच नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे तर आता आपण समजले आहोत. पण हि मैत्री कुठून आणि कशी झाली हे काही कुणाला ठाऊक नाही. अशोक मामा हे नाव घेतलं कि सगळ्यांना महेश, लक्ष्या, सचिन यांची नाव आठवतात. पण मग नानांच नाव का आठवत नाही..? याविषयी सांगताना अशोक मामांनी एक किस्सा सांगितला होता तो असा कि, रंगभूमीवर पाऊल ठेवल्यापासून एकमेकांच्या पडत्या काळात सोबत देईपर्यंत ते अगदी सुपरस्टार होईपर्यंत मामा आणि नाना कायमच एकमेकांसोबत राहिले. पण पडद्यामागे… म्हणून फार कुणाला नानाविषयी माहित नाही.
पुढे अशोक मामा सांगतात कि, ‘नानाने माझा जीव वाचवला आहे. तो किस्सा असा होता की, एकदा नाटक रद्द झालं म्हणून लोक मला मरायला माझ्या मागे धावले होते. त्यावेळी नाना मदतीला धावून आले आणि मला थिएटरच्या मागच्या बाजूने उडी मारायला लावून पळवून घेऊन गेले. पूर्वी हाती ओढणारी रिक्षा असायची, ती रिक्षा थांबवून त्याने स्वतः ओढली आणि मला घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचला. म्हणून मी म्हणतो कि, तो होता म्हणून मी वाचलो.’ यानंतर आम्ही ‘हमीदाबाईची कोठी’ नाटक एकत्र केलं आणि आमची मैत्री अधिकच घट्ट झाली.
याविषयी सांगताना नाना म्हणाले कि, ‘हमीदाबाईची कोठी नाटक करताना मला ५० रुपये मिळायचे आणि अशोकला २५० रुपये मिळायचे. त्या काळात अशोकने मला पैशांची खूप मदत केली. नाटकाच्या मधल्या वेळात आम्ही पत्ते खेळायचो. त्यावेळी मला पैसे मिळावे म्हणून तो मुद्दाम हरायचा. हे माझ्या लक्षात यायचं. पण मला पैशांची गरज होती म्हणून मीही कधी बोललो नाही. अगदी नाटकानंतर बऱ्याचदा मी अशोकचं डोकं चेपून द्यायचो, पाय चेपायचो आणि त्याचेही तो मला पैसे द्यायचा. अशी हि नाना आणि मामांची मैत्री आजही तशीच आहे. सुगंधित आणि अबाधित. या मैत्रीला कुणाची नजर न लागो आणि वाचक मित्रांनो तुमच्याही मैत्रीचा वेळ असाचं फुलत राहो!
Discussion about this post