हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे यांनी आजवर रंगभूमी, छोटा पडदा आणि अगदी मोठ्या पडद्यावरही अनेक मनाला भिडणाऱ्या कलाकृती आपल्याला दिल्या आहेत. यामुळे त्यांची ख्याती काही औरच आहे. शिवाय आजोबा शाहीर साबळे यांचा लोकसंगीताचा वारसा देखील पाणीच जपला. त्यामुळे केदार शिंदे यांच्याकडे चित्रपट सृष्टीत अत्यंत मानाने पाहिले जाते.
यानंतर शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाची त्यांनी केलेली घोषणा हि प्रेक्षकांसाठी आनंद वार्ता ठरली. या दरम्यान जवळपास १२ वर्षांनी केदार शिंदे अजय- अतुल यांच्यासह काम करणार आहेत. या अनुभवाची वाच्यता करणारी एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
केदार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा संगीतावर अवलंबून आहे. अजय अतुल यांच्यासोबत १७ वर्षांनंतर काम करण्याचा योग जुळून आला आहे. बहूतेक हे विधी लिखित होतं. पहिला सिनेमा “अगं बाई अरेच्चा” यातलं “मल्हारंवारी” हे गीत शाहीरांनी गाऊन अजरामर केलं. त्यांच्या सिनेमासाठी अजरामर संगीत देण्यासाठी अजय अतुल आणि मी एकत्र आलोय. माझ्या लेकीच्या पहिल्या सिनेमाच्या, पहिल्या वहिल्या गाण्याला सुध्दा त्यांनीच संगीत द्यावं…?? उत्सुक आहे पुढे तुमच्यासमोर संगीत आणण्यासाठी!!’
केदार शिंदे यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे. शिवाय हि पोस्ट चांगली चर्चेतदेखील आहे. विशेष सांगायचे म्हणजे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट अगदी पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. आधी अंकुश चौधरी याचा शाहीर भूमिकेतील लूक समोर आला. त्यानंतर सना शिंदेंचे मोठ्या पडद्यावरील पदार्पण आणि आता अजय अतुल यांचे संगीत. त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. अजय अतुल या चित्रपटासाठी संगीत देणार म्हणजे प्रेक्षकांसाठी हि मनोरंजनाची पर्वणीच म्हणावी लागेल. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post