हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री कंगना रनौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट या चित्रपटाची चर्चा सतत होत आहे. या चित्रपटात आपल्या अभिनयापेक्षा जास्त परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री कंगना हि इंदिरा गांधींची भूमिका साकारतेय. यासह इमर्जन्सी चित्रपटाच्या माध्यमातून ती दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करते आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकांवरील हळूहळू पडदे उघडत आहेत. दरम्यान नुकताच आणखी एक स्टार लूक समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेता सतीश कौशिक हे माजी उपपंतप्रधान जगजीवन राम म्हणजेच बाबूजी यांची भूमिका साकारणार असे दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपल्या आगामी चित्रपटाचे हे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरसह तिने संबंधित व्यक्तिरेखा आणि कलाकाराची ओळख सांगितली आहे. हे पोस्टर शेअर करताना कंगनाने लिहिले आहे कि, ‘सतीश कौशिक या चित्रपटात माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांची भूमिका साकारत आहेत. ‘शेवटचे पण कमी नाही. इमर्जन्सीमध्ये पॉवरहाऊस सतीश कौशिक हे जगजीवनर राम यांच्या भूमिकेत आहेत. जगजीवन राम यांना बाबूजी म्हणूनही ओळखले जाते. ते भारतीय इतिहासातील सर्वांत प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक होते’.
देशाचे माजी उपपंतप्रधान जगजीवन राम म्हणजेच बाबूजी यांचा जन्म बिहारमधील आरा येथील आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत गोरगरिबांच्या हितासाठी काम केले. यामुळे त्यांना ‘गरिबांचा नेता’ असेही म्हटले जायचे. आता इमर्जन्सी चित्रपटात बाबूजींच्या भूमिकेत सतीश कौशिक लोकांना कितपत प्रभावित करतात हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
याआधी श्रेयस तळपदे हा माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या भूमिकेत तर अनुपम खेर हे जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत असल्याचे समोर आले होते. याशिवाय महिमा चौधरी पुपुल जयकर, मिलिंद सोमण हे सॅम माणिकशॉ आणि विशाक नायर संजय गांधींची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे.
Discussion about this post