Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नेटफ्लिक्सच्या ‘अनकही कहानिया’मध्ये झळकणार रिंकू राजगुरू; नव्या संधीबाबत बोलताना म्हणाली…

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 18, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटच्या अफाट प्रसिद्धीनंतर अत्यंत प्रकाश झोतात आलेला एक चेहरा म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू. आर्चीच्या पात्राने तिला अशी एक ओळख दिली कि त्यानंतर ह्या आर्चीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर पुन्हा परत रिंकूने काही मागे वळून पहिले नाही. आता रिंकू राजगुरू आणखी एका मोठ्या यशाकडे वाटचाल करत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू नेटफ्लिक्सच्या आगामी ‘अनकही कहानिया’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच तिच्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

नेटफ्लिक्सच्या या चित्रपटामध्ये प्रेमाच्या ३ कथा पाहायला मिळणार आहेत. यातील एकात रिंकू झळकणार आहे. अश्विनी तिवारी, अभिषेक चौबे, साकेत चौधरी यांनी या चित्रपटातील कथांसाठी दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू सोबतच या चित्रपटामध्ये अभिषेक बॅनर्जी, झोया हुसेन, कुणाल कपूर, पालोमी, देलझाद हिवले हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. रिंकूने इंस्टाग्रामवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. रिंकू या पोस्टमध्ये लिहीते की, ‘या मोठ्या शहरात प्रेम मिळणं सोपी गोष्ट नाही. अश्याच प्रेमाची अनकही कहानिया लवकरच नेटफ्लिक्सवर १७ सप्टेंबरला येत आहे.’

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

या चित्रपटातील भूमिकेविषयी व्यक्त होताना रिंकू म्हणाली कि, ‘ही एक अशी मुलगी आहे, जी स्वतः एका दलित कुटुंबातून पुढे आली आहे. तिने वर्षानुवर्षे स्त्रियांवर होणारा अत्याचार पाहिला आहे. इतका अत्याचार सहन करूनही या स्त्रीया गप्प का बसतात, असा प्रश्न तिला नेहमीच पडत असतो. आता ही मुलगी स्वतःच्या पायांवर उभी राहिली आहे. इतकंच नाही तर या स्त्रियांच्या आणि आपल्या हक्कासाठी जोरदार लढा देणार आहे, अशी लढाऊ आशा साकारताना मला देखील खूप छान वाटलं.’

Tags: Ankahi KahaniyaNetflixOTTrinku rajguruSairat Fame
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group