हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत अनेकदा शेअर करताना दिसते. त्यामुळे तीच चर्चेत असणं साहजिक आहे. पण नेहमीफोटो व्हिडीओ किंवा आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत असलेली रिंकू आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो पाहून ती आजारी पडलीये का तिला आणखी काय झालाय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. तर चाहते चिंतेत पडले आहेत.
अभिनेत्री रिंकू राजगुरूचा व्हायरल होणारा हा फोटो खरंतर वेब मालिका आणि सिरीज अभिनेत्री रश्मी साळवी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला आहे. जो फेसबुकवरदेखील व्हायरल होतोय. या फोटोमध्ये रिंकूने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर रंगबेरंगी ओढणी परिधान केली आहे. या फोटोमध्ये रिंकू नेहमीसारखी फ्रेश दिसत नाही हे तुम्हालाही जाणवेल. अतिशय मलून चेहरा आणि ठाकल्यासारखी वाटणारी रिंकू आजारी तर नाही ना..? असेच काहीसे हा फोटो पाहून वाटेल.
या फोटोवर अनेकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. पण आश्चर्य म्हणजे कितीतरी नेटकऱ्यांनी काळजी नव्हे तर ट्रोलिंगचा सूर ओढला आहे. रिंकूच्या काही चाहत्यांनी तिच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. पण काहींनी तर कमेंट्समध्ये कहर केलाय. आता सिनेमा मिळत नाहीत म्हणून तिची अशी अवस्था झाल्याचं काहींनी म्हटलंय. तर काहींनी सगळं खेळ मेकअपचा असतो असेही म्हटले आहे. याशिवाय काहींनी थेट मोठमोठ्या आजारांची नाव घेत यांपैकी कुठला तरी आजार झाला असेल असेही म्हटले आहे.
आगामी काळात रिंकूचा आठवा रंग प्रेमाचा हा चित्रपट रिलीज होणार आहे. याआधी तिचा हा फोटो चर्चेत आला असून यावर सुरु असलेलं ट्रोलिंग रिंकूवरील प्रेक्षकांचं प्रेम कमी होतंय का काय..? असा प्रश्न निर्माण करीत आहे.
Discussion about this post