Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तुझ्यासाठी मी अख्ख्या जगासोबत भांडू शकते’; रितेश- जिनिलिया साजरी करतायत प्रेमातल्या वेडेपणाची 11 वर्षे

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 3, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Riteish Genelia
0
SHARES
68
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक ३ फेब्रुवारी असून २०१२ साली याच दिवशी बॉलिवूड इंडस्ट्रीचं क्युट कपल अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख एकमेकांसोबत लग्न बेडीत अडकले होते. आज त्यांच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस ते साजरा करत आहेत. लग्नाआधी दोघांनी डब्बाल ९ वर्षे एकमेकांना गुपचूप डेट केले आणि त्यानंतर कुटुंबाच्या सहमतीने ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केले. हि जोडी सोशल मीडियावरील बहुचर्चित आणि ट्रेंडिंग जोडी आहे. शिवाय या जोडप्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आज ऍनिव्हर्सरीनिमित्त जिनिलियाने रोमँटिक आणि एक विनोदी पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

जिनिलियाने रितेशसोबतचा एक फोटो शेअर करत, ‘अनंतकाळापर्यंत एकत्र’ असे कॅप्शन दिले आहे. तर आजच्या दिवसाचे औचित्य साधून एक रील बनवून शेअर केला आहे. या रिलमध्ये नवरा बायकोतील विनोदी संवाद आहे. यात नवरा बायकोला म्हणतो कि, ‘तुमच्यासाठी मी पूर्ण जगासोबत भांडू शकते’. तर नवरा म्हणतो कि, ‘पण तू तर अख्खा दिवस माझ्याशीच भांडत असतेस..’ यावर बायको म्हणते कि, ‘हो.. कारण तुम्हीच तर माझं जग आहात’. या व्हिडिओसोबत जिनिलियाने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘ऍनिव्हर्सरीनिमित्त एक रील तर बनता है!’ रितेश जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलियाची यांनी २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरे नाल लव हो गया’ या हिंदी सिनेमात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. यानंतर हि जोडी पुन्हा एकदा २०१४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘लय भारी’मध्ये धुवून टाक या हटके मराठी गाण्यात थिरकताना दिसली होती. हे गाणे त्या वर्षातील प्रचंड लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरले. यानंतर आता २०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ या मराठी चित्रपटामध्ये हे एकत्र दिसले आणि दोघांनीही बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. हा चित्रपट तेलगू चित्रपट ‘मजीली’चा अधिकृत मराठी रिमेक आहे.

Tags: Anniversary specialGenelia D'souza DeshmukhRiteish deshmukhTrending CoupleViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group