हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या देशात महिला किती सुरक्षित आहेत हा अतिशय गंभीर आणि वादग्रस्त विषय झाला आहे. याचे कारण म्हणजे महिलांचे संरक्षण हा केवळ एक मुद्दा झालाय . यावर कधी राजकारण होत तर कधी चिखलफेक पण त्रास होतो तो पिडीतेलाच. त्यातल्या त्यात काही वर्षांपासून नियम कडक केले असता महिलांसाठी काहीसा दिलासा मिळतोय. मात्र तरीही गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना भयंकर वाढल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या युपीमधील ललितपूरमध्ये घडलेल्या अत्याचाराप्रकरणी अनेकांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. या घटनेचे देशभर पडसाद उमटत असताना अभिनेता रितेश देशमुख याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अगर यह सच है तो इससे बदतर कुछ नहीं हो सकता। रक्षक ही भक्षक बन जाए तो आम इंसान न्याय माँगने कहाँ जाए। ऐसे लोगों को सरे आम, चौराहे पर मारना चाहिए। साकार जल्द कार्यवाही करे और सख़्त से सख़्त सजा दे। https://t.co/lYuNBZB3cK
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 4, 2022
बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता रितेश देशमुखने या घटनेवर प्रतिक्रिया देताना अतिशय संतापल्याचे दिसून आले. अतिशय तीव्र आणि कडक शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे. तब्बल ४ जणांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची हि घटना जितकी हृदयद्रावक तितकी संतापजनक आहे. शिवाय पीडित जेव्हा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली तेव्हा अधिकाऱ्यानेही तक्रार नोंदवून घेण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. यामुळे अशा घटनेवर प्रखरपणे बोलणे अतिशय गरजेचे आहे, असे म्हणत रितेशने आपला संताप व्यक्त केला आहे.
याबाबत बोलताना आपल्या बोलण्याचे लोकं काय अर्थ काढतात त्यापेक्षा जे बोलणं गरजेचं आहे ते बोललं पाहिजे अशी भूमिका रितेशने घेतली. उत्तर प्रदेशातील १३ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराची बातमी समजताच रितेश अस्वस्थ झाला आणि त्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आरोपींवर तीव्र कडक शब्दांत संताप व्यक्त केला आहे. अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून ट्विट करत रितेश म्हणाला कि, ही घटना जर खरी असेल तर ज्या नराधमांनी असं कृत्य केलं आहे त्यांना भरचौकात मारलं पाहिजे. रिपोर्टनुसार, पीडित पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेली तेव्हा ज्या पोलीस अधिकाऱ्यानं तिचं शोषण केलं त्याचं नाव तिलकधारी सरोज असे असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. पोक्सो अॅक्ट अंतर्गत सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Discussion about this post