हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच देशात लोकप्रिय झालेले टिक टॉक हे व्हिडीओ मेकिंग ऍप बंद झाले आहे. हे एक असे ऍप होते ज्यावर सर्वसामान्य व्यक्तीपासून ते अगदी बॉलिवूड सुपरस्टार सगळेच व्हिडीओ तयार करून शेअर करत होते आणि लोकांची पसंती मिळवत होते. दरम्यान या टिकटॉकने कित्येकांना स्टार बनवल्याचे पाहायला मिळाले. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी देखील टिकटॉकवर सक्रिय होते. विविध व्हिडीओ बनवून ते ट्रेंड झाले आणि लाईक वाढले कि मग काय पैसाच पैसा. पण आता टिक टॉक बंद झाल्यामुळे रितेश बिचारा बेरोजगार झाला आहे.
View this post on Instagram
बॉलीवूड आणि मराठी इंडस्ट्रीत अव्वल दर्जाचे काम करणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याचे सोशल मीडियावरील असंख्य फॉलोअर्स आहेत. विशेषतः त्याच्या मजेदार रिल्समूळे त्याचे चाहते आनंदी होत असतात. या व्हिडीओ तो इंस्टाग्रामवर शेअर करतो. टिकटॉकचा ट्रेंड रितेशला खूप चांगला पावला होता. परंतु आता टिकटॉक बंद झाल्याने रितेश देशमुखला आर्थिक फटका बसला आहे. एका मुलाखतीदरम्यान रितेशने आपले हे दुःख माध्यमांसोबत शेअर केले आहे.
View this post on Instagram
या मुलाखतीत रितेश देशमुख म्हणाला, टिक-टॉकवर व्हिडिओ बनविण्याची सुरुवात लॉकडाऊनदरम्यान झाली होती. हा तो काळ होता, जेव्हा प्रत्येकजण कठीण काळातून जात होता. मग, आम्हाला वाटले आपण त्यांना हसण्याचे काहीसे निमित्त देऊ. जेव्हा टिक-टॉकवर बंदी घालण्यात आली तेव्हा वाटले की, आपण बेरोजगार झालोय. मग इन्स्टा रील आले. मी म्हणालो चला, रील आले बरं झाले. तथापि, हे खरं आहे की, मी टिकटॉकवरून पैसे कमवत होतो आणि ते बंद झाल्यानंतर, त्यातून कमाईवर नक्कीच परिणाम झाला आहे.
Discussion about this post