Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रितेशला चढली कोळी गाण्याची झिंग; डान्स व्हिडीओ झाला भन्नाट वायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 16, 2021
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Riteish Deshmukh
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या कित्येक दिवसांपासून एका आगरी- कोळी गीताची चर्चा जोरदार सुरु आहे. खरतर आगरी आणि कोळी गीताची भाषा, त्यांचा ताल हे सगळ्यांना अगदी फेर धरायला  लावणारे असते. अश्याच एका गाण्याने संपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय. इतकंच नव्हे तर आयपीएल २०२१ साठी मैदानात उतरलेल्या, मुंबई इंडियन्सच्या संघातील खेळाडूंनाही या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. आता यात अभिनेता रितेश देशमुखच्या सुद्धा भर पडली आहे. त्यानेही या गाण्यावर भन्नाट डान्स करीत व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश नेहमीच सोशल मीडिया अकाऊंटवर ऍक्टिव्ह असतो. तो कायमच त्याच्या चाहत्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटोज टाकत असतो. पत्नी जेनेलिया आणि मुलांसोबत तो कायमच काही अफलातून पोस्ट शेअर करत असतो. यावेळी मात्र रितेश एक दमदार सोलो परफॉर्मन्स करताना दिसतोय.
त्याचा हा व्हिडीओ ‘एक नारल दिलाय दर्या देवाला’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना आहे. हा व्हिडीओ प्रचंड वायरल होतोय. सोबतच प्रेक्षकांनी या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिलाय.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आगरी- कोळीगीत या प्रकारात मोडणारे हे गाणे प्रीत बांदरे आणि ध्रुवन मूर्थी या तरुणांनी तयार केले आहे. सध्या यांची गाणी तरुणाईसोबत सर्व वयातील लोकांना थिरकायला लावणारी आहेत. मग कलाकार मागे कसे राहतील? या गाण्यावर रितेशनं सुरेख हावभाव करत नृत्य सादर केले आहे. अगदी साधं, सोप्प आणि रोजचीच वेशभूषा करीत त्याने हा व्हिडीओ बनविला आहे. त्याचा हा अंदाज चाहत्यांना खूप भावला आहे. आतापर्यंत रितेशच्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले असून, अनेक चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये यावरील प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

सोशल मीडियावर व्हायरल होणारे मीम्स म्हणू नका किंवा मग एखादा ट्रेंडिंग विषय नाहीतर कोणताही वायरल मुद्दा. रितेश या अनोख्या विश्वात चर्चेत असणाऱ्या अनेक ट्रेंड्सना त्याच्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडत असतो. त्यामुळे फक्त रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर या सोशल मीडियाच्या दुनियेतही तो खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मन जिंकतोय असे म्हणायला काही हरकत नाही.

Tags: Dhruvan Murthygenelia deshmukhInstagram PostPreet BandreRiteish deshmukhViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group