Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘.. तेव्हा मला आठवतं की मी कोणाचा मुलगा आहे’; वडिलांच्या वाढदिवशी रितेशची भावनिक पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 26, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा वाढदिवस आहे. विलासराव देशमुख हयात नसले तरीही त्यांनी केलेल्या कामामुळे आजही जनतेच्या मनात ते जिवंत आहेत. आजही महाराष्ट्रातील तमाम जनता विलासरावांच्या आठवणीत भावुक होताना दिसते. विलासराव यांचा मुलगा रितेश देशमुख हा बोलिकवुड तसेच मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. मात्र त्याच्या अंगी असलेले गुण आणि त्याचे संस्कार त्या इतरांपेक्षा वेगळं दर्शवतात. आज वडिलांच्या वाढदिवसानिमित्त रितेशने एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्यामुळे एखाद्या खास प्रसंगाचे वर्णन किंवा खास दिनाचे औचित्य साधून तो अशा विविध पोस्ट शेअर करत असतो. अशातच आज त्याच्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि या दिवशी त्यांच्या आठवणीत लेकाचं भावुक होणं साहजिक आहे. ‘एखाद्याचं हास्य हे त्याच्या हृदयाचं खरं प्रतिबिंब असतं’, असं कॅप्शन देत रितेशने विलासरावांचा अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने स्वतःचा आणि वडील विलासरावांचा एकत्र हसतानाचा फोटो देखील शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

तसेच आणखी एक पोस्ट शेअर करत त्याने लिहिले आहे कि, ‘माझ्या कठीण काळात.. जेव्हा मला अक्षम, अपुरे, पराभूत वाटते तेव्हा मला आठवते की मी कोणाचा मुलगा आहे आणि मी जग घेण्यास तयार आहे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा’. रितेशच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट शेअर केल्या आहेत. एकाने लिहिले आहे कि, ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, मराठवाड्याचे भूमिपुत्र : स्व.विलासरावजी देशमुख साहेब! बाभळगावचे सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक, राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री आणि राज्याचे दोनदा मुख्यमंत्री अशा ३५ वर्षांतील सातत्यपूर्ण राजकीय प्रवासातून अनेक दिग्गज नेत्यांना मागे टाकत विलासरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. मातीशी नाळ कायम असलेल्या अद्वितीय लोकनेत्यास जयंती दिनी शतशः नमन!’

Tags: Instagram PostLate Ex- CM Vilasrao DeshmukhRiteish deshmukhViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group