Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रणवीर- दीपिकाची अमेरिका टूर; वाईल्ड रोमँटिक फोटो व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 13, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ranveer_Deepika
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांची जोडी पूर्ण इंडस्ट्रीमध्ये हिट आहे. त्यांच्या जोडीची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. तूर्तास सोशल मीडियावर रणवीर आणि दीपिकाच्या वाईल्ड रोमान्सची चर्चा रंगली आहे. त्याच झालं असं नुकताच रणवीर ३७ वर्षाचा झाला असून त्याचा जंगी वाढदिवस झाला. त्यानिमित्त हे कपल अमेरिकेच्या टूरवर गेले होते. तेव्हाचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल झाले असून रणवीरचा बर्थडे जोरदार चर्चेत आलाय.

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

सध्या रणवीर आणि दीपिका अमेरिकेच्या टूरवरून परतले आहेत. गेल्या १० जुलै २०२२ रोजी हे दोघे मुंबईला परतले आणि मुंबई विमानतळावर हातात हात घालून चालताना दिसले. दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ पॅपराझींनी शूट केले होते. दोघांनीही आपल्या खास ट्रिपचे आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. रणवीरसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत दीपिकाने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या होत्या. ‘आपलं आयुष्य अशाच अनुभवांनी आणि साहसांनी भरलेलं असो’, असं कॅप्शन तिने दिलं होत.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

या फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिकाची ट्रिप एकदम जोरात पार पडल्याचे दिसते. शिवाय त्यांचा रोमँटिक अंदाजदेखील पहायला मिळतो. या ट्रिपदरम्यान दीपिकाने फोटोग्राफीचाही आनंद लुटला आहे. समुद्र किनाऱ्यावरील तिने टिपलेले काही फोटो तिने शेअर केले आहेत. रणवीर आणि दीपिकाने ‘गोलियों की रासलीला.. रामलीला’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं आणि इथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तब्बल ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ साली त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर ’83’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं.

Tags: Dipika PadukoneHusband Wife RelationInstagram PostRanveer SingViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group