Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भारतीय सिनेविश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘RRR’ ठरला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 25, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
RRR
0
SHARES
189
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस एस राजमौली यांचा RRR हा चित्रपट प्रचंड गाजला. अजूनही या चित्रपटाबाबत प्रत्येक स्तरावर कोडकौतुक ऐकायला मिळत आहे. अनेक पुरस्कार प्राप्त करून या सिनेमाने आधीच जगभरात भारतीय सिने जगताला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे. अशातच आता RRR हा चित्रपट संपूर्ण जगातील भारी सिनेमा ठरला आहे. नुकतीच हॉलिवूड क्रिटिक असोसिएशन अवॉर्ड्स २०२३ (HCA Film Awards)ची घोषणा झाली. या पुरस्कार सोहळ्यात RRR चित्रपटाचे नाव सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा म्हणून घेण्यात आले.

Mega Power Star @alwaysRamCharan won hearts all over again with his humble acceptance speech when he accompanied his director @ssrajamouli on winning the Best International Film award for #RRR at the @HCAcritics awards. #RamCharan pic.twitter.com/nCiPJEMtm8

— Niharika Gajula (@NiharikaGajula) February 25, 2023

हॉलिवूड क्रिटिक असोसिएशन अवॉर्ड्स २०२३ (HCA Film Awards) हा पुरस्कार सोहळा सिने जगतातील भव्य दिव्य पुरस्कार सोहळा असून अत्यंत मानाचा पुरस्कार सोहळा मानला जातो. या पुरस्कार सोहळ्यात RRR या चित्रपटाने विविध श्रेणीतील पुरस्कार पटकावत सर्वोत्कृष्ट श्रेणीतदेखील मान पटकावला आहे. RRR या सिनेमाला सर्वोत्कृष्ट आंतराराष्ट्रीय सिनेमा म्हणून या सोहळ्यात गौरविण्यात आले आहे. याशिवाय बेस्ट ऍक्शन सिनेमा म्हणूनदेखील RRR ने पुरस्कार पटकावला आहे. इतकेच नव्हे तर RRR सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्यासाठी बेस्ट सॉंग आणि बेस्ट स्टंट असा पुरस्कार मिळाला आहे.

#RRR creates a magnificent history yet again winning awards across 4 categories at the Hollywood Critics Awards.

Hearty congratulations to@ssrajamouli Garu @AlwaysRamCharan @tarak9999 @mmkeeravaani Garu & the entire team. pic.twitter.com/ZQ00DdP7sO

— Sai Dharam Tej (@IamSaiDharamTej) February 25, 2023

RRR या सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी या सोहळ्यात सिनेमाने पटकावले पुरस्कार स्वीकारले आहेत. प्रसिद्ध अभिनेते जुनिअर NTR आणि राम चरण यांच्या अभिनयाने सजलेला, एक विशेष कथानक प्राप्त आणि उत्तम दर्जेदार संगीताची साथ लाभलेला RRR हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्यात बाजी मारून आल्यामुळे भारतीय सिने विश्वाला अभिमानाचा क्षण लाभला आहे. मुख्य म्हणजे यंदाच्या ऑस्कर २०२३ अवॉर्ड्सआधी RRR या सिनेमाने हा सर्वाधिक मोठा सन्मान मिळवला आहे. असे म्हणता येईल कि, RRR सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हॉलिवूडमध्ये भारतीय सिनेमा यशाची उंच शिखरे गाठतोय,

Tags: Hollywood AwardJr.NTRramcharanRRRS.S.RajamouliViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group