हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी माणूस आणि संबंध महाराष्ट्राला दुखेल आणि खुपेल असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. यानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत आहेत. दरम्यान मनोरंजन विश्वातूनही राज्यपालांवर टीका होतेय. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी राज्यपालांच्या विधानावर भाष्य करीत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल म्हणाले होते कि, ‘मुंबई गुजराती, राजस्थानी लोकांमुळे आर्थिकदृष्ट्या सधन आहे. ते गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही.’ यावर सचिन पिळगावकर यांनी आपले मत मांडले आहे.
नागपुरात एका कार्यक्रमात भगत सिंग कोश्यारींनी हे वादग्रस्त विधान केलं होत. यावर कोश्यारी चांगलेच ट्रोल झाले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला आहे. त्यांपैकी एक निषेध करणारे म्हणजे अभिनेता सचिन पिळगावकर. सचिन पिळगावकर यांना कोश्यारी यांच्या वक्तव्याबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी ते म्हणाले कि, ‘मला यासंदर्भात ज्ञान नाही, राज्यपाल असं का म्हणाले हे तेच सांगू शकतात. राजकीय गोष्टींशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांनी खुलासा केला हे देखील मला माहीत नाही. राजकारण हा आमचा विषय नाही. पण आम्ही मराठी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.’
राज्यपालांनी केलेले हे विधान मुंबईकरांच्या मर्मावर बोट ठेवणारे आहे. अनेकांनी या वक्तव्याचा थेट निषेध केला आहे. तर अनेकांनी अप्रत्यक्षपणे यावर वाच्यता केली आहे. पण सोशल मीडियावर उठलेले वातावरण पाहता कोश्यारी यांना हे वक्तव्य चांगलेच जड जाणार असे दिसत आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला आहे. मात्र दिग्गजांनी याबाबत बोलणे सपशेल टाळले आहे.
Discussion about this post