हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपले सतत मनोरंजन करणारे हे कलाकार अनेकदा आपल्या तब्येतीच्या कुरुबुरींकडे बारीक सारीक असेल म्हणून दुर्लक्ष करतात. ज्याचे गंभीर परिणाम पुढे यांना भोगावे लागतात. याचा प्रत्यय अभिनेता सागर कारंडेला आला आहे. गेल्या रविवारी २० नोव्हेंबर रोजी गिरगावातील साहित्य संघ येते त्याच्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचा प्रयोग होता. पण प्रयोगापूर्वी त्याची तब्येत अचानक बिघडली. छातीत दुखी लागलं आणि त्याला चक्कर आली. त्याची तब्येत बिघडल्याचे पाहून हा प्रयोग रद्द करावा लागला. यावेळी जेव्हा सागरला डॉक्टरांकडे नेण्यात आले तेव्हा त्यांनी काही लहान सहान चुका त्याच्या लक्षात आणून दिल्या. मात्र या दरम्यान अनेकांनी सागरच्या प्रकृतीबाबत चुकीच्या बातम्या पसरविल्यामुळे त्याने फेसबुक लाईव्ह करीत हेल्थ अपडेट दिल आहे.
सागर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो म्हणाला आहे कि, ‘गेल्या रविवारी २० नोव्हेंबरला ‘हीच तर फॅमिलीची गंमत’ या आमच्या नाटकाचा प्रयोग संध्याकाळी ४ वाजता साहित्य संघला आयोजित करण्यात आला होता. तेव्हा अचानक माझ्या छातीत दुखू लागले. मला चक्करही आली. दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर मी रुग्णालयात गेलो. माझ्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या. माझे रिपोर्ट नॉर्मल आले. पण चेकअप झाल्यानंतर मला डॉक्टरांनी प्रयोग करण्यास किंवा प्रवास करण्यास मनाई केली होती. त्यामुळे ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला’.
पुढे म्हणाला, ‘छातीत दुखण्यामागचे कारण काय असू शकतं यासाठी माझ्या अनेक टेस्ट करण्यात आल्या. दिवसातून ईसीजी, डी इको करण्यात आली. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले. त्यानंतर डॉक्टरांनी गेल्या काही दिवसात माझ्या कामाबद्दल चौकशी केली. गेला आठवडाभर मी प्रवास करत होतो, रात्री शूटींग, नाटकाचे प्रयोग, प्रवास, जेवण वेळेवर नव्हतं, त्यादिवशी मी काही खाल्लं नसल्याने अॅसिडीटी झाली. अॅसिडीटी वाढल्याने छातीत दुखत होतं, असं डॉक्टरांनी मला सांगितलं. दुसऱ्या दिवशी मला घरी देखील पाठवलं. मी तुमच्याशी बोलतोय याचा अर्थ मी बरा आहे. मला काहीही झालेले नाही. तेव्हा कुणीही चुकीची माहिती पसरवू नका, असेही सागरने म्हंटले आहे.
दरम्यान सागरची प्रकृती अचानक बिघडल्याने नाटकाचा प्रयोग कसा होणार हा एक भला मोठा प्रश्न आयोजकांसमोर होता. पण प्रयोग रद्द न करता सूत्रधार गोट्या सावंत यांनी इकडे तिकडे फोनाफोनी करून ‘वासूची सासू’ या नाटकाचा प्रयोग अरेंज करून दिला. यासाठी सर्व कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या नाटकाचा प्रयोग उत्तमरित्या पार पडला. त्यामुळे मदतीला धाऊन आलेल्या सर्व कलाकार मंडळी आणि ‘वासूची सासू’ या नाटकाच्या टीमचेदेखील सागरने आभार मानले आहेत. पण काही म्हणा हि कलाकार मंडळी कमाल असतात. मायबाप रसिक प्रेक्षक नाराज होऊ नये म्हणून आपली तब्येतही पणाला लावतात. पण जान है तो जहाँन है। त्यामुळे कलाकरांनी आपल्या प्रकृतीची तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे, असे अनेक नेटकरी म्हणत आहेत.
Discussion about this post