हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ या डान्सिंग रिएलिटी शोचा रविवारी ३ जून २०२३ रोजी महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. शोच्या अंतिम टप्प्यापर्यंत आलेल्या प्रत्येकानेच पूर्ण ताकदीनिशी विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र पिंपरी- चिंचवडच्या सई आणि शरयूने बाजी मारत यंदाच्या पर्वाचे विजेतेपद प्राप्त केले. ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ या शोच्या महाअंतिम सोहळ्यात सई आणि शरयू यांना ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ या पर्वात सागर आणि दिवेश, झिरो डिग्री क्रू ग्रुप, डी टू डी क्वीन्स ग्रुप, श्रीमयी सूर्यवंशी आणि सई- शरयू असे पाच अंतिम टप्प्यात लढा देणारे फायनलिस्ट ठरले होते. या पर्वासाठी अंकुश चौधरी, फुलवा खामकर आणि वैभव घुगे आणि परीक्षकांची जबादारी पार पाडली आणि अंतिम निकाल देत सई अन शरयूला ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ विजेता म्हणून घोषित केले. यावेळी शोचे विजेतेपद मिळवणाऱ्या सई आणि शरयूला ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक यांसह ५ लाख रुपये रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
तर, ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ या पर्वात अंतिम टप्प्यात फायनलिस्ट म्हणून सई- शरयूला तगडी टक्कर देणारे सागर- दिवेश हे या पर्वाचे उपविजेता ठरले. तसेच झीरो डिग्री क्रू ग्रुप आणि डी टू डी क्वीन्स ग्रुप यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला. तर श्रीमयी सुर्यवंशीला मात्र चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सोशल मीडियावर ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ या कार्यक्रमाच्या यंदाच्या पर्वाचे विजयीपद मिळवणाऱ्या सई आणि शरयू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Discussion about this post