हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि बोल्ड तितकीच बिनधास्त अभिनेत्री म्हणून उल्लेख केला जाणारी मराठमोळी अभिनेत्री साई ताम्हणकर हि मनोरंजन सृष्टीची आन बान आणि शान आहे. आपले सौंदर्य, मोहक हास्य आणि दर्जेदार अभिनय कला यांच्या माध्यमातून तिने आपला असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. अगदी मराठी चित्रपटसृष्टी ते बॉलीवूड चित्रपटसृष्टीमध्ये तिने आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. अनेक रसिक मनांवर राज्य करणाऱ्या सईने नेहमीच यशाची नवनवी शिखरे पार केली आहेत. यानंतर आता सईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नुकतेच सईला IMDBच्या ‘बेस्ट ऑफ २०२१’ च्या यादीत टॉप १० मध्ये मनाचे स्थान मिळाले आहे. याबद्दल तिच्यावर केवळ मनोरंजन सृष्टी नव्हे तर अन्य सर्व क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
IMDB अर्थात इंटरनेट मुव्ही डेटाबेसने(Internet Movie Data Base) नुकतीच टॉप १० ब्रेकआऊट स्टार्स ऑफ इंडियन फिल्म्स ऍण्ड वेब सीरिजची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये IMDB कडून अभिनेत्री सई ताम्हणकरचा उल्लेख केला करीत तिचा गौरव केला आहे. सई ताम्हणकरने यावर्षी ‘समांतर’, ‘नवरसा’ आणि ‘मीमी’ या तीन वेगवेगळ्या भाषांच्या कलाकृतींमधून अव्वल, दर्जात्मक, आव्हानात्मक आणि अतिशय वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांद्वारे रसिकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. याचीच दखल घेऊन IMDBने तिला या यादीमध्ये महत्वाचे स्थान दिले आहे.
IMDB कडून मिळालेला गौरव हा साई सोबतच संपूर्ण मनोरंजन सृष्टीसाठी एक मानाचा क्षण आहे. त्यामुळे माध्यमांशी बोलताना सईच्या भावनांमध्ये एक हलकीशी भावुकता आणि तितकाच आत्मविश्वासाचा स्पॉट लाईट झळकत होता. दरम्यान माध्यमांशी बोलताना साई म्हणाली, ‘IMDB हा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. कलाकृतीला भाषेचे बंधन न लावता, त्याकडे पाहण्याचा विस्तीर्ण दृष्टिकोण ग्लोबल सिनेमा आणि वेब सीरिजचा असतो. अशा ठिकाणी माझ्या कामाचा गौरव होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
सई ताम्हणकर चा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगलीत झाला. सई लहान असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. ‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून सईने टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. यानंतर तिने मागे वळून कधीच पाहिले नाही. ‘अनुबंध’, ‘अग्निशिखा’, ‘तुझं माझं जमेना’, ‘साथी रे’ या मालिकांमध्येही तिने काम केले आहे.
पुढे तिने ‘सनई चौघडे’ हा चित्रपट केला आणि रसिकांच्या जोहरी नजरेला हिऱ्याची पारख झाली. या चित्रपटापासून सईला मागे वळून पाहायला कधी वेळच मिळाला नाही. सईने धुरळा, प्यार वाली लव्ह स्टोरी, क्लासमेट, दुनियादारी, वजनदार या चित्रपटांमध्ये केलेल्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले. तर नो एंट्री पुढे धोका आहे या चित्रपटातील बोल्ड सई देखील अनेकांना भावली.
Discussion about this post