Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जिंकून आलंया, साई तुझं लेकरू’; ‘टाईमपास 3’च्या गाण्याची सोशल मीडियाला भुरळ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 5, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Timepass 3
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर काहीच दिवसात टाईमपास २ प्रदर्शित झाला. या दोन्ही भागांनी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आणि यांनतर आता लवकरच टाईमपासचा तिसरा भाग म्हणजेच ‘टाइमपास ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यामुळे आता दगडू पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. तुम्हाला तर माहीतच आहे कि, दगडी साईबाबांचा मोठा भक्त आहे. त्याची भक्ती आणि प्रेम सादर करणार ‘साई तुझं लेकरू’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याची सोशल मीडियावर भारी चर्चा देखील आहे आणि चाहत्यांना हे गाणं आवडलं आहे.

‘आई- बाबा आणि साईबाबा’ची शपथ म्हणणारा दगडू ‘टाइमपास ३’ आता काय धमाल करतो हे पाहणे उत्सुकतेचं आहे. सध्या तरी ‘साई तुझं लेकरू’ हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात भाऊ कदम दगडूच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. ते साईबाबांसमोर आभार मानत, दगडू तुमचाच लेकरू असल्याचे सांगत आहेत. या गाण्यात भाऊ कदम, प्रथमेश परब, आरती वडगबाळकर, मनमीत पेम, ओंकार राऊत आणि जयेश चव्हाण हे कलाकार मुख्य फ्रेम मध्ये दिसत आहेत. हे संपूर्ण गाणे दगडू, त्याच कुटुंब, मित्र आणि वस्तीतली मंडळी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. ‘तुझा हात असताना आता कुणाला घाबरू.. जिंकून आलंया साई तुझं लेकरू’ अशा या गाण्याच्या भन्नाट ओळी आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

या गाण्याचे बोल हे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले आहेत. शिवाय अमितराज यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. इतकेच नव्हे तर, तरुणाईला वेड लावणारा गायक आदर्श शिंदे आणि अमितराज यांनी हे गाणं गायले आहे. तर राहुल ठोंबरे आणि संजीव होवलादार यांनी गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित ‘टाइमपास ३’ चे दिग्दर्शन रवी जाधव यांचे असून हा चित्रपट आधीच्या चित्रपटांसारखाच हटके असणार आहे. कारण यावेळी दगडूच्या आयुष्यात ‘पालवी’ येणार आहे. पण हि पालवी काय हलकी नाही. एक हटके भूमिका घेऊन अभिनेत्री हृता दुर्गुळे प्रथमेश परबसोबत ‘टाइमपास ३’ मध्ये दिसणार आहे. येत्या २९ जुलै २०२२ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags: Hruta DurgulePrathmesh ParabRavi JadhavTimepass 3Viral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group