हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | एका मुलाखती दरम्यान रामायण आणि रावणा संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अभिनेता सैफ अली खानला सर्वच स्तरातून रोषाला सामोरे जावे लागत होते. अखेर सैफ अली खानने आपल्या वक्तव्या बद्दल माफी मागितली आहे. सैफने स्पष्ट केलं कि, मला असं कळलंय कि माझ्या मुलाखतीमुळे प्रचंड गदारोळ पसरला आहे. आणि यामुळे लोकांच्या भावनाही दुखावल्यात कुणाला दुखावण्याचा माझा हेतू न्हवता किंवा मला असं काही म्हणायचं न्हवत मी मनापासून माफी मागत. आणि माझं वक्तव्य मागे घेतो. प्रभू श्रीराम कायमच माझ्यासाठी शक्ती आणि सामर्थ्याच प्रतीक आहेत. आदिपुरुषच्या माध्यमातून दुर्जनांवर सज्जनांचा मोठा विजय दाखवला आहे आणि संपूर्ण टीम याच दृष्टीने काम करत आहे. यात कुठलेही बदल नाही असं सैफने स्पष्ट केलं आहे.
यापूर्वी नक्की काय म्हणाला होता सैफ –
मुलाखतीदरम्यान सैफ म्हणाला होता कि, ‘राक्षसी राजाची व्यक्तिरेखा साकारणे मनोरंजक आहे, परंतु तो इतके क्रूर नव्हता. रावण हा माणूस म्हणून कसा होता? याचे चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रावणाने भगवान श्री राम यांच्यासोबत युद्ध केले, हे सर्वांनाच माहिती आहे.
परंतु, या युद्धालाही एक पार्श्वभूमी आहे. श्री रामाच्या धाकटा भाऊ लक्ष्मण यांनी रावणाची बहीण सुर्पनखाचे नाक कापले होते. त्यांनतर हे युद्ध होणारच होते. रावणची विचारसरणी काय होती? हे या चित्रपटातून प्रेक्षकांच्यासमोर घेऊन येणार आहोत, असे सैफ मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’