हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने विश्वात तुफान गाजलेला चित्रपट म्हणजे सैराट. या चित्रपटाने कित्येक चित्रपटांचे मोठमोठे रेकॉर्ड तोडले. या चित्रपटातील एक अन एक पात्र प्रेक्षकांच्या मनात वसलं आहे. त्यामुळे हि कलाकार मंडळी नेहमीच विविध कारणांनी चर्चेत राहिली आहेत. मात्र आता जी बातमी समोर आली आहे ती वाचून अनेकांना धक्का बसू शकतो. सैराट चित्रपटातील मुख्य पात्र आर्चीच्या भावाची भूमिका साकारणारा प्रिन्स अर्थात अभिनेता सुरज पवार याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याच्यावर कारवाई होऊन अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रसिद्ध कलाकार सुरज पवार ज्यानं सैराटमध्ये प्रिन्सची भूमिका केली होती तो चांगलाच अडचणीत सापडणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. अभिनेत्यावर नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकऱणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय क्षिरसागर (रा. नाशिक), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे (रा. संगमनेर ) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपींवर भादवि कलम 420, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हि फिर्याद नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी दिली आहे.
फिर्यादीनुसार फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्ताऐवज तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली आहे. आरोपींनी फिर्यादीला मंत्रालयात नोकरी लावण्यासाठी ५ लाखांची मागणी केली होती. सुत्रांनुसार, मंत्रालयात नोकरी लावून देतो असे सांगून सुरजने आपली फसवणूक केल्याची माहिती फिर्यादीत दिलेली आहे. हे मोठे रॅकेट असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे आरोपींनी भारताच्या राजमुद्रादेखील बनावट करुन त्याचा दुरुपयोग केला असल्याची माहिती समोर आली आहे. हा देशद्रोहासारखा गुन्हा असल्यामुळे राहुरी पोलीस लवकरच सैराट फेम सुरज पवारला अटक करतील अशी शक्यता आहे.
Discussion about this post