हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठीत पन्नासहून अधिक चित्रपट दिग्दर्शित केलेले आघाडीचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा नवाकोरा मराठमोळा चित्रपट आज रिलीज होतो आहे. अतिशय वेगानं चित्रपट पूर्ण करण्यात अहिरेंचा हात कुणीच धरू शकत नाही. नॉट ओन्ली मिसेस राऊत, शेवरी, अनुमती अशा दर्जेदार कलाकृतींनंतर आता तरुणांचे लक्ष वेधून घेणारा ‘साजिंदे’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातून अभिनेता ऋषिकेश वांबुरकर एका वेगळ्या, हटके आणि महत्वपूर्ण भूमिकेत दिसून येतोय.
शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून ‘चिन्या’ हे हटके पात्र साकारणारा अभिनेता हृषीकेश वांबुरकर आता चित्रपट सृष्टीत आपले नशीब आजमावताना दिसत आहे. झोंबिवली नंतर आता ‘साजिंदे’ या चित्रपटातून त्याने लिमिटेड पप्याची भन्नाट भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरमधील त्याचे डायलॉग्स आणि त्याची प्रेक्षकांचे लक्ष ओढून घेण्याची कला भारी न्यारी आहे. ‘मी जसा असन तसा मी माझ्या आईचा ससा’ या डायलॉगने तर कमालीची धमाल उडवली आहे. शिवाय भावाला प्रेम झाला ना या गाण्याचीही तरुणांना झिंग चढली आहे. तर साजिंदेच्या कोंबड्याने तर सोशल मीडियावर कहर केलाय कहर.
या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट २२ जुलै २०२२ रोजी VMAS मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो आहे. आतापर्यंत माणूस प्रेमात जीव देतो बऱ्याच वेळा ऐकलंय, पण कधी कुणाला प्रेमात जीव घेताना पाहिलंय का..?? अशा टॅगलाईनमुळे चित्रपटात नेमकं काय आणि कसं कथानक दर्शवलं आहे याबाबत प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. तर आजपासून हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे आणि तोही ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
या चित्रपटात नवनवीन तरुण कलाकार आपल्या अभिनयाने मोहून टाकण्यास सज्ज आहेत. यामध्ये ऋषीकेश वांबुरकर, कश्मिरा ताकटे, अमित रेखी, तेजस टाक, धनंजय गाडेकर, कौस्तुभ हिंगे, प्रशांत जठार, राहुल सुराणा, भक्ती डांगे, अभिजित दळवी, स्वप्नील नजान, ऋषिकेश पठारे, रोहन पठारे, मेघमाला पठारे हे कलाकार आपल्या कलेची प्रतिभा दर्शवित आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांचे असून स्क्रीनप्ले सुद्धा त्यांचाच आहे. शिवाय निर्मिती पायल पाठारे, मेघमाला पाठारे आणि अक्षरफिल्म्सची आहे. तर छायाचित्रण कृष्णा सोरेन यांचे असून संगीत नरेंद्र भिडे, गजेंद्र अहिरे यांचे आणि बॅक ग्राउंड संगीत चैतन्य आडकर यांचे आहे. तसेच चित्रपटातील गाण्यांना आदर्श शिंदे, आनंदी जोशी आणि शौनक अभिषेकी या सुरेल गायकांचा आवाज लाभला आहे. हा चित्रपट तरुणाईला लागलेल्या प्रेमाच्या वेडाबद्दल बोलतोय.. हे वेड जितकं गोड तितकं घातक. यात मिळतं किती आणि गमावतो काय हे महत्वाचं… चित्रपटाचे कथानक अतिशय वेगवान असून यात थोडी कॉमेडी, ऍक्शन, ड्रामा आणि फुल्ल प्रेम पहायला मिळणार आहे. त्यामुळे VMAS मराठी ऍप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि हा चित्रपट जरूर पहा.
Discussion about this post