Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चिरंजीवीच्या ‘गॉड फादर’मध्ये भाईजानची वर्णी; पहा ॲक्शन टिझर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 22, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
GodFather
0
SHARES
37
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेला सलमान खान नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याची लोकप्रियता प्रचंड असून त्याच फॅन फॉलोईंग मोठं आहे. त्यामुळे भाईजानचा चित्रपट येणार एव्हढं समजलं तरी चाहते खुश होतात. बॉलिवूडवर अधिराज्य गाजवल्यानंतर आता सलमान साऊथ सिनेइंडस्ट्रीत नशीब आजमावताना दिसणार आहे. साउथचे मेगास्टार चिरंजीवी यांचा आगामी चित्रपट ‘गॉड फादर’चा टिझर अलीकडेच रिलीज झाला आहे. या टिझमध्ये चिरंजीवीसोबत अभिनेता सलमान खान ॲक्शन मोडमध्ये दिसतो आहे.

 

चिरंजीवीच्या ‘गॉड फादर’ या चित्रपटात अभिनेता सलमान खान एका खास व्यक्तिरेखेत दिसणार आहे. त्यामुळे सलमानचे चाहते त्याला या चित्रपटात पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. सलमानचा हटके अंदाज पाहून बॉलिवूडनंतर आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीवर देखील सलमान अधिराज्य गाजवू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ‘गॉड फादर’ या चित्रपटाच्या टीझरने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. सलमानपेक्षा जास्तच चिरंजीवी यांचं फॅन फॉलोईंग आहे. त्यामुळे हा चित्रपट हिट आहे यात काही वाद नाही. पण सलमानसाठी मात्र हि एक संधी असे म्हणता येईल. या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा साकारताना दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Chiranjeevi Konidela (@chiranjeevikonidela)

या चित्रपटात नयनतारा ‘गॉड फादर’च्या विरोधात्मक भूमिकेत दिसणार आहे. गॉडफादर परत यावा अशी तिची इच्छा नाही. या चित्रपटाद्वारे सलमान खान पहिल्यांदाच साऊथ सिनेसृष्टीत नशीब आजमावणार आहे. सलमानची कॅमिओ भूमिका चित्रपटाच्या कथेत काय वळण आणते आणि किती मजा आणते हे पाहणं उत्सुकतेचं आहे. ‘गॉडफादर’ हा एक राजकीय ॲक्शनपट असून याचे दिग्दर्शन मोहन राजा यांनी केले आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या लुसिफर चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. माहितीनुसार, येत्या ५ ऑक्टोबर २०२२ रोजी दसऱ्याला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Tags: ChiranjeeviNew Upcoming MovieOfficial TeaserSalman KhanSouth Megastar
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group