Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Salman Khan : सलमान खानच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचे निधन; जिममध्ये वर्कआउट करताना अचानक कोसळला..

Adarsh Patil by Adarsh Patil
September 30, 2022
in Breaking, बातम्या, सेलेब्रिटी
Salman Khan
0
SHARES
2.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । मनोरंजन क्षेत्रासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचे आज निधन झाले आहे. जिममध्ये वर्कआउट करताना अचानक कोसळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

सलमान खान याचा बॉडी डबल सागर पांडे यांचे आज मुंबईत निधन झाले आहे. सागरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जिम वर्कआउट करताना सागरला छातीत दुखू लागले, त्यानंतर तो जमिनीवर पडला. सागरची प्रकृती चिंताजनक असल्याचं पाहून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला पाहताच मृत घोषित केले. (Salman Khan)

सागर पांडे नेहमीच सलमान खानचा मोठा चाहता होता आणि त्याच्या खूप जवळचाही होता. त्याने अनेक चित्रपटांमध्ये सलमान खानसोबत बॉडी डबल म्हणून काम केले आहे. सागरचे वय ४० ते ४५ दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. सागरच्या मृत्यूचा संबंध राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूशी जोडला जात आहे. जिममध्ये वर्कआउट करताना राजूलाही हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर महिनाभराहून अधिक काळ राजू यांच्यावर उपचार सुरु होते.

शुक्रवारी सागर नेहमीप्रमाणे जिम करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. व्यायाम करत असताना अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर काही वेळातच तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्याची अवस्था पाहून जिममध्ये उपस्थित लोक घाबरले. सागरला तातडीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. (Salman Khan)

सागरने सलमान खानसोबत ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते. त्यानंतर त्याने सलमान खानसोबत बॉडीगार्ड, बजरंगी भाईजान, दबंग, दबंग 2 यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. बॉलिवूड स्टार्स त्यांच्या चित्रपटांसाठी खूप मेहनत घेतात. पण त्यांची बॉडी डबलही तेवढीच मेहनत करतात. इंडस्ट्रीमध्ये फार कमी अभिनेते त्यांच्या अ‍ॅक्शन सीन्स स्वतःहून करतात. अनेक मोठे अभिनेते त्यांच्या अवघड सीन्ससाठी बॉडी डबल वापरतात.

Tags: death newsmumbaiSalman Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group